पाण्यात खराब होणार नाही हे कूल ईयरबड्स ! Micromax चे Airfunk 1 आणि Airfunk 1 Pro लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Micromax ने शुक्रवारी ऑनलाइन कार्यक्रमात नवीन प्रोडक्ट्स लाँच केले. या कार्यक्रमात कंपनीने नवीन ऑडिओ विभागात एन्ट्री करत मायक्रोमॅक्स Airfunk 1 आणि Airfunk 1 Pro ही दोन नवीन इअरबड्स बाजारात आणली. हे दोन्ही मायक्रोमॅक्स इअरबड्स चमकदार रंगामध्ये आले असून ते पाणी प्रतिरोधक आहेत. तसेच, मायक्रोमॅक्सने त्याच कार्यक्रमात Micromax In 2B बजेट फोन देखील लाँच केला. वाचा: Airfunk 1, Airfunk 1 Pro किंमत आणि उपलब्धता Airfunk 1 Pro काळ्या, पांढऱ्या, निळ्या , जांभळ्या आणि लाल रंगात लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत २,४९९ रुपये आहे. तर, Airfunk 1 काळ्या, पांढऱ्या, निळ्या , जांभळ्या रंगात उपलब्ध असेल. या इयरफोनची किंमत १,२९९ रुपये आहे. दोन्ही इयरबड्स १८ ऑगस्टपासून micromaxinfo.com आणि Flipkart वर उपलब्ध केले जातील. Mircromax Airfunk 1 वेगळ्या व्हॉईस चेंज फंक्शनसह आलं आहे जो तुम्हाला कॉल दरम्यान तुमचा आवाज स्त्री पुरुषांच्या आवाजात बदलू देतो. चांगल्या चित्रपट आणि संगीताच्या अनुभवासाठी, मायक्रोमॅक्स Airfunk 1 ३ डी सराउंड साऊंड स्टीरिओ मोडसह येतो. उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हा इयरबड ब्लूटूथ ५.० ला सपोर्ट करतो. Airfunk 1 पूर्ण चार्ज केल्यास ५ तासांचा प्लेटाईम देतो . यात टाइप-सी चार्जिंग सपोर्ट देखील आहे. मायक्रोमॅक्सच्या या इयरबड्सला आयपी ४४ रेटिंग मिळाले आहे. म्हणजेच हे डिव्हाईस पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहे. यात स्मार्ट टच कंट्रोल सिस्टम व्यतिरिक्त, Google सहाय्यक आणि सिरी व्हॉईस कमांड समर्थन देखील आहे. Airfunk 1 मोनो आणि स्टीरिओ वापराला देखील समर्थन देते, म्हणजेच तुम्ही एक इयरफोन चार्ज होत असतांना दुसरा वापरू शकता. Mircromax Airfunk 1 Pro Mircrormax Airfunk 1 Pro मध्ये क्वालकॉम क्यूसीसी ३०४० चिपसेट देण्यात आला आहे. हे इयरफोन एएनसी तंत्रज्ञान आणि क्वाड मायक्रोफोनसह आहेत जे पार्श्वभूमीचा आवाज कमी करतात आणि ऑडिओ स्पष्ट करतात. हे इयरबड्स नवीन ब्लूटूथ ५.२ सह येतात आणि कंपनीचे म्हणणे आहे की, डिव्हाइस १० मीटर अंतरावर देखील कनेक्ट करता येते. आयपी ४४ रेटिंगसह येणारे हे इयरबड्स पाणी, घाम आणि धूळ यांमध्ये खराब होणार नाहीत, असे मायक्रोमॅक्सचे म्हणणे आहे. हे इयरबड्स मोनो आणि स्टीरिओ सपोर्ट, स्मार्ट टच कंट्रोल, व्हॉईस असिस्टंट सपोर्टसह येतात. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C6Kkm3

Comments

clue frame