नवी दिल्ली : आणि सारख्या ब्रँड्सला टक्कर देण्यासाठी ने भारतात आपल्या दोन नवीन टॉप लोड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला लाँच केले आहे. या दोन्ही मशीन पॉवरफूल असून शानदार फीचर्ससोबत येतात. थॉमसनने Six Action Pulsator 6.5 KG आणि Six Action Pulsator 7.5 KG फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला बाजारात सादर केले आहे. या देण्यात आलेल्या पॉवरफुल मोटारद्वारे कपडे व्यवस्थितपणे स्वच्छ होतील. मशीनच्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया. वाचाः किंमत किंमतबद्दल सांगायचे तर Six Action Pulsator 6.5 KG फुली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनची किंमत १२,४९९ रुपये (TTL ६५०१) आहे. तर थॉमसन Six Action Pulsator 7.5 KG फुली ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशीनची किंमत १४,९९९ रुपये (TTL ७५०१) आहे. ग्राहक या मशीन्सला ग्रे रंगात फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. मिळेल चाइल्ड लॉकची सुविधा थॉमसनच्या या दोन्ही वॉशिंग मशीनचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे. TTL६५०१ मॉडेलमध्ये १५० वॉटची मोटर देण्यात आली आहे. तर TTL ७५०१ मॉडेलमध्ये १८० वॉटची मोटर देण्यात आली आहे. यात देण्यात आलेली मोटर Aluminium / Copper ची आहे. यातील ड्रमचे डिझाइन डायमंट कट असून, यात ऑटो पॉवर सप्लाय कट ऑफ फीचर आणि थर्मल प्रोटेक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. मशीनमध्ये LED डिस्प्ले, वॉटर प्रूफ पॅनेल, कॅस्टर व्हील, डिटर्जेंट बॉक्स आणि शॉक प्रूफची सुविधा मिळते. वॉशिंगसाठी वेगवेगळे प्रोग्राम देखील आहे. याशिवाय चाइल्ड लॉकची देखील सुविधा मिळते. स्पेशल फीचर्सबद्दल सांगायचे तर यात ट्यूब क्लिन, एअर ड्राय आणि वन टच स्टार्ट सारखे फीचर्स मिळतील. थॉमसनच्या या दोन्ही टॉप लोड फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनची टक्कर LG, Samsung, Panasonic, Whirlpool आणि Onida सारख्या ब्रँड्सशी असेल. किंमत आणि फीचर्सच्या बाबतीत थॉमसनचे दोन्ही मॉडेल्स खूपच किफायतीशीर आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zXUdjI
Comments
Post a Comment