Jio-Airtel चे जबरदस्त प्लान्स, डेटा-कॉलिंगसह मिळेल Disney+ Hotstar मोफत सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : तुम्हाला ओटीटी अ‍ॅप्सवरील कॉन्टेंट पाहण्याची आवड असेल तर टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लान्समध्ये ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. भारतीय टेलिकॉम बाजारात आणि च्या काही प्लान्समध्ये Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. एवढेच नाही तर यामध्ये हाय-स्पीड डेटा आणि मोफत कॉलिंगची देखील सुविधा मिळते. हे प्लान्स कोणते आहेत जाणून घेऊया. वाचाः Jio चा ४०१ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. यात अतिरिक्त ६ जीबी डेटा देखील दिला जात आहे. प्लानमध्ये डिज्नी+ हॉटस्टारसह अ‍ॅप्सचा देखील मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. Airtel चा ४४८ रुपयांचा प्रीपेड प्लान या प्लानमध्ये ग्राहकांना मोफत डिज्नी+ हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन मिळते. प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. वाचाः Jio चा ५९८ रुपयांचा प्रीपेड प्लान जिओच्या या प्लानमध्ये डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. ५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. Airtel चा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ग्राहकांना या प्लानमध्ये डिज्नी+ हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राइमचे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय दररोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. ५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l8cQ0i

Comments

clue frame