Infinix चा धमाका, खूपच कमी किंमतीत भारतात लाँच केला ४० इंच स्मार्ट टीव्ही; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने भारतात एक नवीन लाँच केला आहे. हाँगकाँगच्या या कंपनीने स्मार्ट टीव्हीला ३२ इंच आणि ४३ इंच व्हेरिएंटमध्ये लाँच केल्यानंतर आता ४० इंच अँड्राइड स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये बेझल लेस फ्रेम डिझाइन देण्यात आली आहे, जे इमर्सिव्ह व्ह्यूइंग अनुभव प्रदान करते. यात डॉल्बी ऑडिओचा देखील सपोर्ट मिळेल. वाचाः नवीन लाँचबाबत बोलताना इनफिनिक्स इंडियाचे सीईओ, अनीश कुमार म्हणाले की, ग्राहकांच्या मनोरंजनाच्या गरजा पूर्ण होतील यादृष्टीने इनफिनिक्स सातत्या नवीन प्रोडक्ट्स आणत आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या ३२ इंच आणि ४३ इंच टीव्हीला शानदार प्रतिसाद आणि फ्लिपकार्टवर ४.२ स्टार रेटिंग मिळाल्यानंतर आम्ही ४० इंच FHD डिस्प्ले स्मार्ट टीव्ही सादर करण्यास तयार आहोत. ते पुढे म्हणाले की, यामध्ये परफेक्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मिळतो, जो व्ह्यूइंग एक्सिपियन्स वाढवतो. यूजर्सला यामध्ये हजारो अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळेल. तसेच, मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्क्रीनला मिरर देखील करू शकता. किंमत आणि फीचर्स Infinix ने भारतात एक्स१ ४० इंच अँड्राइड स्मार्ट टीव्हीला फक्त १९,९९९ रुपयात लाँच केले आहे. फ्लिपकार्टवर ८ ऑगस्टपासून या स्मार्ट टीव्हीची विक्री सुरू होईल. या टीव्हीमध्ये ४० इंच स्क्रीन ब्लू लाइट रिडक्शन टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये एचडीआर १० सपोर्ट मिळतो. याशिवाय डॉल्बी ऑडिओसोबत २४ वॉट बॉक्स स्पीकरचा देखील सपोर्ट मिळेल. जे स्पष्ट आवाज प्रदान करते. यात मीडियाटेक ६४ बिट क्वाड-कोर चिपसेटसोबतच १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. यामध्ये बिल्ट-इन क्रोमकास्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lgj9Ps

Comments

clue frame