Infinix २ ऑगस्टला भारतात लाँच करणार स्वस्तात मस्त स्मार्टफोन, किंमत १० हजारांपेक्षा कमी

नवी दिल्ली : निर्माता कंपनी इनफिनिक्सने या वर्षाच्या सुरुवातीला ला भारतात लाँच केले होते. आता कंपनी या फोनचे नवीन मॉडेल ला २ ऑगस्टला भारतीय बाजारात सादर करणार आहे. या डिव्हाइसची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल. याशिवाय ग्राहकांना फोन खरेदीवर जिओकडून खास ऑफर देखील मिळेल. वाचा: इनफिनिक्सने Smart 5A स्मार्टफोनसाठी टेलिकॉम कंपनी जिओसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत Exclusive Device Lock Program लाँच करण्यात आला आहे. यूजर्सने स्मार्ट ५ए स्मार्टफोन खरेदी केल्यास, जिओकडून ५५० रुपये कॅशबॅक मिळेल. लॉक प्रोग्राम अंतर्गत प्रायमरी सिमला ३० महिन्यांसाठी लॉक केले जाईल. Infinix Smart 5A ची संभाव्य किंमत इनफिनिक्सने अद्याप या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचरबाबत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र, रिपोर्टनुसार हा फोन ५ ते १० हजार रुपये किंमतीत येऊ शकतो. Infinix Smart 5A चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स लीक रिपोर्टनुसार, या पोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. डिव्हासमध्ये ६.५२ इंच एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये मिड रेंज प्रोसेसर आणि दमदार कॅमेरा मिळू शकतो. इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही. Infinix Smart 5 Infinix Smart 5 स्मार्टफोन ७,१९९ रुपये किंमतीत भारतीय बाजारात उपलब्ध आहे. स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर यात ६.८२ इंचाचा एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो जी२५ प्रोसेसर, ६००० एमएएचची बॅटरी मिळेल. बॅटरी सिंगल चार्जमध्ये ५३ तासांचा बॅकअप देते. कॅमेरा इनफिनिक्स स्मार्ट ५ स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l5jTH1

Comments

clue frame