शेजाऱ्यांपेक्षाही मोठा टीव्ही घरी आणा, Infinix ने लाँच केला 40 इंच स्मार्ट टीव्ही बजेट किमतीत, पाहा किंमत

नवी दिल्ली. ३२ आणि ४३ इंचाच्या टीव्ही प्रकारानंतर, Infinix ने आता नवीन Android Infinix X1 ४० इंच बाजारात दाखल केला आहे. कंपनीने त्यात डोळ्यांची काळजी घेण्याचे तंत्रज्ञान दिले आहे. म्हणजेच टीव्ही पाहताना, स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशाच्या तरंग लांबीला नियंत्रित करेल. कंपनीने हा टीव्ही १९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला आहे. या टीव्हीची विक्री ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ६ ऑगस्टपासून सुरू होईल. पाहा डिटेल्स. वाचा: Infinix X1 40 इंच स्मार्ट टीव्ही खऱ्या बेझल-लेस फ्रेम-लेस डिझाइनसह येतो. जे उत्तम स्क्रिन पाहण्याच्या अनुभवासाठी उच्च स्क्रीन-टू-बॉडी रेशियो प्रदान करते. इन्फिनिक्सचा हा आकर्षक डिझाईन असलेला टीव्ही तुमच्या खोलीचे इंटीरियरही छान बनवतो. यामध्ये, EPIC 2.0 इमेज इंजिन चित्र गुणवत्ता सुधारण्यासाठी तीक्ष्णता, रंग, कॉन्ट्रास्ट, स्पष्टता वाढवण्यासाठी अल्गोरिदम आहे. टीव्ही HDR १० ला सपोर्ट करतो, जे स्क्रीनवर चांगले आणि नैसर्गिक रंग देते. एचडीआर १० सह, या टीव्हीमध्ये ३५० एनआयटी ब्राइटनेसचे कॉम्बिनेशन आहे. हे आपोआप ब्राइटनेस लेव्हल कस्टमाईज करण्यास सक्षम आहे. स्मार्ट टीव्ही अनेक वैशिष्ट्यांने सुसज्ज Infinix X1 40 इंच टीव्ही ब्लू लाइट रिडक्शन टेक्नॉलॉजीसह येतो. बराच वेळ टीव्ही पाहण्याने डोळ्यांना गंभीर नुकसान होऊ शकते, परंतु हे वैशिष्ट्य डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवते. एलईडी पॅनल हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये इन्फिनिक्सच्या या टीव्हीमध्ये नेत्र काळजी तंत्रज्ञान देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.साउंड सिस्टीमबद्दल बोलायचे तर, Infinix X1 मालिका इन-बिल्ट बॉक्स स्पीकर्ससह येते. यात उच्च बाससह चांगला आवाज अनुभव तुम्हाला मिळेल. २४ W डॉल्बी एटमॉससह बॉक्स स्पीकर्स देण्यात आले असून हा टीव्ही एक स्पष्ट आणि शक्तिशाली सिनेमॅटिक ध्वनी अनुभव प्रदान करेल. टीव्हीमध्ये डिफॉल्ट Chromecast प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या अँड्रॉइड टीव्हीमध्ये लेटेस्ट मीडियाटेक ६४ बिट क्वाड कोर चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. या टीव्हीमध्ये १ GB रॅम आणि ८GB इंटर्नल स्टोरेज आहे. यासह, कमी-उर्जेमध्ये उच्च कार्यक्षमतेचा आनंद यात घेता येतो. Infinix X1 40 इंच टीव्ही डिफॉल्ट क्रोमकास्टसह येतो. युजर्स हा टीव्ही डान्स फ्लोर, रेस ट्रॅक किंवा स्मार्टफोन कंट्रोलरच्या स्वरूपात बदलू शकतात. यातील वन-टच Google सहाय्यक ग्राहकांना वैयक्तिकृत अनुभव प्रदान करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j5CfoW

Comments

clue frame