Huawei ने लाँच केला ७५ इंचाचा दमदार स्मार्ट टीव्ही, २४MP कॅमेऱ्यासोबत मिळणार भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली : ने Smart Screen V 75 Super लाँच केला आहे. कंपनीचा हा पहिली असा टीव्ही आहे, जो मिनी-एलईडी डिस्प्ले सोबत येतो. याला SuperMiniLED म्हटले जात आहे. सोबतच, कंपनीचा हा पहिला टीव्ही आहे जो २ वर काम करतो. नवीन ऑपरेटिंग सिस्टम शानदार अनुभव प्रदान करतो. यात कंपेटिबल मोबाइल डिव्हाइससाठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. Smart Screen V 75 Super टीव्हीसोबतच कंपनीने Sound X 2021 देखील लाँच केले आहेत, जे स्मार्ट लाइटनिंग इफेक्टसह येतात. याबाबत सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Huawei Smart Screen V 75 Super टीव्ही आणि ची किंमत: Huawei Smart Screen V 75 Super स्मार्ट टीव्हीची किंमत २४,९९९ CNY (जवळपास २,८७,७०० रुपये) आहे. टीव्ही इंटरस्टॅलर ब्लॅक रंगात येतो. याला VMall द्वारे प्री-बुकिंग करू शकता. याचा सेल १२ ऑगस्टपासून सुरू होईल. Huawei Sound X 2021 ची किंमत २,१९९ CNY (जवळपास २५,३०० रुपये) आहे. याचे प्री-बुकिंग देखील VMall च्या माध्यमातून होत असून, १८ ऑगस्टपासून विक्री सुरू होईल. Huawei Smart Screen V 75 Super स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन्स: Huawei Smart Screen V 75 Super HarmonyOS २ वर काम करतो. यात ७५ इंच अल्ट्रा एचडी ४के मिनी-एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात ४६ हजारांपेक्षा अधिक मिनी-एलईडी लाइट्स देण्यात आले आहे. टीव्हीमध्ये ऑटोमॅटिक ब्राइटनेस एडजस्टमेंट आणि डायनॅमिकली एडजस्टेड कलर टेम्प्रेचर देण्यात आले आहे. टीव्ही Honghu ८९८ चिपसेटवर काम करतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. Smart Screen V 75 Super स्मार्ट टीव्हीमध्ये २४ मेगापिक्सलचा पॉप-अप वेबकॅम देण्यात आला आहे, जो यूजर्सला एकसोबत १२ लोकांशी व्हर्च्यूअली कनेक्ट करतो. यात देण्यात आलेल्या HarmonyOS मध्ये एक खास फीचर मिळते, जे वेबकॅमद्वारे रियर-टाइम फिटनेस ट्रेनिंग आणि ऑनलाइन क्लासेज इनेबल करते. यात स्मार्ट होम एक्सेसरीजला कंट्रोल करण्यासाठी अनेक फीचर्स आहेत. फोनवरून कॉन्टेंट टीव्हीवर मिरर करू शकता. टीव्हीसोबत वॉइस-सपोर्टेड रिमोट देण्यात आला आहे. यात एनएफसी सपोर्ट देखील मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ४ एचडीएमआय २.० पोर्टेस, डीटीएमबी, दोन यूएसबी ३.० आणि आरजे४५ (इथरनेट) पोर्ट मिळतात. Huawei Sound X 2021 चे फीचर्स: हे डिव्हाइस HarmonyOS वर काम करते. याचे डिझाइन डोम-शेप्ड आहे. कंपनीचे म्हणणे आहे की याचे डिझाइन इलेक्ट्रॉनिक ट्यूबवरून प्रेरित आहे. याच्या लाइटनिंग रिंग स्पीकरला ७ मोनोक्रोमिक कलरने कव्हर करते. यात ५० वॉटचे वूफर दिले आहेत, जे चार ५वॉट फुल-रेंज स्पीकर्ससोबत जोडलेले आहेत. हा स्पीकर मोबाइल डिव्हाइस आणि पीसीसोबत देखील कनेक्ट होतो. यात HyperTerminal तंत्रज्ञान देण्यात आले आहे, जे वेगवेगळ्या डिव्हाइसद्वारे ऑडिओ स्ट्रीम करते. यात ह्युवाईचे Xiaoyi डिजिटल असिस्टंट देण्यात आले आहे, जे व्हर्च्यूल कॉलद्वारे स्मार्ट डिव्हाइसला कनेक्ट आणि कंट्रोल करू शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3C0UzIb

Comments

clue frame