६ GB रॅमसह कमी किंमतीत लाँच झालेला Micromax In 2b बजेट युजर्ससाठी चांगला पर्याय, पाहा किंमत

नवी दिल्ली: इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मायक्रोमॅक्सने अखेर शुक्रवारी आपल्या इन सीरिजचा नवीन हँडसेट लाँच केला. हा एक बजेट फोन आहे असून कंपनीने एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये फोनचे लॉंचिंग केले. या मालिकेचा हा चौथा स्मार्टफोन आहे आणि तो बजेट प्रकारातही येतो. ५००० एमएएच बॅटरी, ६ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज सारखे फीचर्स फोन मध्ये देण्यात आले आहेत. मायक्रोमॅक्सने या कार्यक्रमात दोन नवीन फंकी इअरबड्स देखील लाँच केले. पाहा डिटेल्स. वाचा: Micromax In 2b किंमत आणि उपलब्धता Micromax In 2b च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये आहे. तर, ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट ८,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हँडसेट ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन रंगात उपलब्ध असेल. हा हँडसेट ६ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. Micromax In 2b वैशिष्ट्ये Micromax In 2b ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅमसह ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्यायासह येतो. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. फोनमध्ये ६. ५२ इंचाचा एचडी + एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक प्रोसेसरही आहे. कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, मायक्रोमॅक्स फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे ज्यामध्ये २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. डिस्प्लेवर असलेल्या नॉचमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. 2B मध्ये मायक्रोमॅक्सला शक्ती देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी १० W चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फोन १६० तासांपर्यंत संगीत प्लेबॅक, २० तासांपर्यंत वेब ब्राउझिंग, १५ तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि पूर्ण चार्जवर ५० तासांचा टॉकटाइम ऑफर करतो. हा फोन एंड्रॉइड ११ च्या जवळच्या-स्टॉक आवृत्तीवर काम करतो . कंपनीने फोनवर सॉफ्टवेअर अपडेटची हमी देखील दिली आहे. VoWifi, Dual VoLTE, USB Type-C port, Audio Jack, Bluetooth, Wi-Fi, GPS, A-GPS सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि मागच्या बाजूला फेस अनलॉक सारखी वैशिष्ट्ये असून Micromax In 2b मध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर, लाईट सेन्सर आणि अ‍ॅक्सिलरोमीटर देखील देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f8sd56

Comments

clue frame