नवी दिल्ली: डिझोने ऑडिओ विभागात देखील अनेक उपकरणे देखील लाँच केली. लाँचच्या जवळ-जवळ एक महिन्यानंतर, डिझोतर्फे भारतात एक विशेष सेल सुरू करण्यात येत आहे, ज्या दरम्यान कंपनी ऑडिओ उत्पादनांवर विशेष सवलत देत आहे. हा सेल १ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून सुरू होणार असून तो ३ ऑगस्टपर्यंत चालेल. या सेल दरम्यान आणि इयरफोन सवलतीत खरेदी करण्याची संधी युजर्सकडे आहे. वाचा: Dizo GoPods D आणि इतर वायरलेस इयरफोनच्या खरेदीवर २०० रुपयांची सूट देत आहे. या सूटनंतर १,५९९ च्या किंमतीत लाँच करण्यात आलेले Dizo GoPods D इयरफोन १,३९९ मध्ये उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे १,४९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आलेले Dizo Wireless इयरफोन १,२९९ रुपयांमध्ये उपलब्ध असतील. इच्छुक खरेदीदार फ्लिपकार्टद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतील. Dizo GoPods D ची वैशिष्ट्ये Dizo GoPods D इयरफोन १० मिमी मोठे ड्रायव्हर्स आणि बूस्ट+ अल्गोरिदमसह सुसज्ज आहेत, जे कंपनीचे म्हणणे आहे की, विशेषत: स्मूथ ऑडिओ अनुभव देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. इयरफोन IPX4 धूळ आणि पाणी-प्रतिरोधक कोटिंगसह येते आणि गेम मोडसह मनोरंजक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. हे इयरबड १२० मिनिटांचा प्लेबॅक वेळ देतात. Dizo Wireless ची वैशिष्ट्ये Dizo Wirelessच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात ११.२ मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, युजर्सना त्यात १७ तासांची बॅटरी मिळेल. यासह, ८८ ms लो-लेटन्सी, पर्यावरणीय आवाज रद्द करणे, ब्लूटूथ ५ आणि पाणी प्रतिरोधनासाठी IPX4 प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3icsGVW
Comments
Post a Comment