नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून चे सह-संस्थापक यांनी वापरलेल्या वस्तूंचा कोट्यावधी रुपयात लिलाव होत आहे. आता जॉब्स यांच्या जुन्या नोकरी अर्जाचा लिलाव करण्यात आला आहे. या अर्जाचा चौथ्यांदा लिलाव करण्यात आला असून, यंदा एनएफटी व्हर्जनचा समावेश करण्यात आला आहे. हा जॉब्स यांनी १९७३ साली लिहिला असून, ते तेव्हा १८ वर्षांचे होते. विशेष म्हणजे ज्या अर्जाचा लिलाव केला जात आहे, तो एकमेव अर्जच आपल्या आयुष्यात जॉब्स यांनी भरला होता. वाचा: जॉब्स यांच्या या नोकरी अर्जाचा चौथ्यांदा लिलाव करण्यात आला आहे. याआधी २०१७ मध्ये १८,७५० डॉलर्स, २०१८ मध्ये १,७४,७५७ डॉलर्स आणि मार्च महिन्यात २,२२,४०० डॉलर्समध्ये लिलाव करण्यात आला होता. यावेळी अर्जाचे फिजिकल आणि डिजिटल व्हर्जन दोन्ही सेलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. या नोकरी अर्जाचा ऑनलाइन लिलाव झाला. याच्या फिजिकल व्हर्जनसाठी ३४३,००० डॉलर्सची (जवळपास २,५५,१२,५११ रुपये) बोली लागली. तर एनएफटी व्हर्जनला Ethereum द्वारे खरेदीसाठी ठेवण्यात आले होते. यासाठी २३,०७६ डॉलर्स बोली लागली. जॉब्स यांनी या अर्जात नाव, पत्ता, फोन भाषा, ड्रायव्हिंग लायसन्स आणि स्पेशल एबिलिटिजची माहिती दिली होती. अर्ज चांगल्या स्थितीत असल्याचा देखील लिलावात उल्लेख करण्यात आला होता. स्टीब जॉब्स यांच्या अर्जाची या वर्षी मार्चमध्ये २,२२,४०० डॉलर्समध्ये (जवळपास १.६ कोटी रुपये) विक्री झाली होती. तर आता ३,४३,००० डॉलर्समध्ये (जवळपास २.५ कोटी रुपये) विक्री झाली आहे. यावरून लक्षात येते की या अर्जाची किंमत काही महिन्यातच प्रचंड वाढली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x84TL2
Comments
Post a Comment