नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपला सर्वात स्वस्त ४९ रुपयांचा प्लान बंद केला आहे. त्याऐवजी कंपनीने ७९ रुपयांचा प्लान सादर केला आहे. या प्लानमध्ये यूजर्सला डेटा, कॉलिंगचा फायदा मिळते. एअरटेलच्या या प्लानला जिओचा ७५ रुपयांचा प्लान जोरजार टक्कर देत आहे. हा प्लान खासकरून यूजर्ससाठी आहे. या दोन्ही प्लान्समध्ये काय फायदे मिळतात व कोणाचा प्लान सर्वोत्तम आहे जाणून घेऊया. वाचाः चा ७९ रुपयांचा प्लान प्रीपेड स्मार्ट रिचार्ज डबल डेटा ऑफरसह येतो. यामध्ये यूजर्सला ६४ रुपये टॉक टाइम दिला जात आहे. यात लोकल/एसटीडी/लँडलाइनसाठी १ पैसा प्रति सेकेंद शुल्क आकारले जाते. सोबतच, २०० एमबी डेटा देखील मिळतो. यात आउटगोइंग एसएमएसची सुविधा मिळत नाही. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. चा ७५ रुपयांचा प्लान हा प्लान खासकरून जिओफोन यूजर्ससाठी आहे. याला JIOPHONE ALL-IN-ONE PLAN म्हटले जाते. याची वैधता २८ दिवस असून, यात एकूण ३ जीबी डेटा दिला जातो. यात दररोज १०० एमबी डेटा आणि अतिरिक्त २०० एमबी डेटा मिळतो. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ५० एसएमएसची सुविधा मिळतो. हा प्लान बाय वन गेट वन ऑफरसह येतो. म्हणजेच एका रिचार्जवर दोन प्लान्सचा लाभ मिळेल. याशिवाय अॅप्सचा देखील अॅक्सेस मिळतो. Airtel आणि Jio मध्ये कोणता सर्वोत्तम दोन्ही प्लान्समधील फायदे पाहिल्यास जिओ बाजी मारतो. मात्र, जिओचे प्लान्स केवळ जिओफोन यूजर्ससाठीच आहे. सर्व यूजर्स वापरू शकत नाही. तर एअरटेलचा प्लान सर्व यूजर्ससाठी आहे. परंतु, जिओच्या प्लानची किंमत देखील कमी आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i8CFLV
Comments
Post a Comment