नवी दिल्लीः करोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे आता मार्केट मध्ये कंपन्या आरोग्याच्या दृष्टीने नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत आहेत. ग्राहकांचे आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन कंपन्यांनी गेल्या आठड्यात दोन नवीन स्मार्टवॉच लाँच केल्या आहेत. Inbase आणि कंपनीच्या स्मार्टवॉचची फीचर्स आणि किंमत पाहा. या दोन्ही कंपन्यांनी भारतात बजेट सेगमेंट मध्ये आपली स्मार्टवॉच लाँच केली आहे. वाचाः Portronics स्मार्टवॉच पोट्रोनिक्स (Portronics ) ने भारतात आपली नवीन स्मार्टवॉच 'क्रोनोस बीटा' () ला लाँच केले आहे. या स्मार्टवॉचचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १०० हून जास्त वॉच फेस मिळतात. ज्यात तुम्ही आपल्या स्टाइलनुसार, सेट करू शकता. स्मार्टवॉचमुळे लोकांच्या वेळेचे बचत होते तसेच आरोग्यावर लक्ष ठेवता येते. ग्राहकांची फिटनेस ओळखून यात ट्रॅकिंग सुविधेची डिझाइन करण्यात आली आहे. यात १.२८ इंचाचा हाय रिझॉल्यूशन टीएफटी डिस्प्ले दिला आहे. यात १० स्पोर्ट्स मोड आहे. क्रोनोस बीटा स्मार्टवॉच मध्ये ५१२ एमबी स्टोरेज क्षमता दिली आहे. यात ३०० गाणे स्टोरे करता येवू शकता. यात १०० हून जास्त फेस दिले आहेत. क्रोनोस बीटा स्मार्टवॉच वर तुम्ही २४ तास आपली हार्ट रेट मॉनिटर करू शकता. या स्मार्टवॉचला तीन वेगवेगळ्या रंगात उपलब्ध केले आहे. या स्मार्टवॉचची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Urban Play स्मार्टवॉच इनबेस (Inbase)ने हाय परफार्मेंस रियलटेक चिपसेट असलेली अर्बन प्ले स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. ही स्मार्टवॉच हाय परफॉर्मन्स रियलटेक चिपसेट दिले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे गेम खेळण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. यात १.३ इंचाचा फुल टच अल्ट्रा ब्राइट डिस्प्ले दिला आहे. अर्बन प्ले स्मार्टवॉच ब्लूटूथ 5.0 आणि एक सोपे होम बटन दिले आहे. यात हवामानाचे अपडेट पाहू शकता. कॅमेरा, संगीत इत्यादी कंट्रोल करू शकता. अर्बन प्ले मध्ये 1.30 इंचाचा फुल टच अल्ट्रा-ब्राइट डिस्प्ले (360X360 रेजोल्यूशन) दिला आहे. अर्बन प्ले स्मार्टवॉचमध्ये बॅटरी, फुल चार्ज केल्यानंतर ७ दिवसांचा बॅटरी बॅक अप मिळते. या स्मार्टवॉचची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2V1V8ko
Comments
Post a Comment