भन्नाट प्लान! एका दिवसात वापरू शकता १६०० जीबी डेटा; डिज्नी+ हॉटस्टार देखील फ्री

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मागील काही दिवसात यूजर्ससाठी अनेक शानदार अनलिमिटेड इंटरनेट लाँच केले आहे. या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड डेटा आणि मोफत कॉलिंगसह काही अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. कंपनीच्या या प्लानची सुरुवात २९९ रुपयांपासून होते. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कंपनी कोणत्याही लिमिटशिवाय १६०० जीबीपर्यंत डेटा ऑफर करत आहे. तसेच, काही ब्रॉडबँड प्लानमध्ये Disney+ Hotstar चे प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील मोफत देत आहे. या ब्रॉडबँड प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः बीएसएनएलचा २९९ रुपयांचा प्लान कंपनीच्या या प्लानचे नाव १००GB CUL आहे. हा प्लान नवीन यूजर्ससाठी असून, ६ महिन्यांसाठीच मिळतो. ६ महिन्यानंतर यूजर्सला २००GB CUL मध्ये मायग्रेट केले जाते. २९९ रुपयांच्या प्लानमध्ये १० एमबीपीएस स्पीडने कोणत्याही लिमिटशिवाय १०० जीबी डेटा मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यानंतर स्पीड २ एमबीपीएस मिळेल. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. बीएसएनएलचा ३९९ रुपयांचा प्लान ३९९ रुपयांच्या या मासिक प्लानमध्ये कंपनी १० एमबीपीएस स्पीडने महिन्याला २०० जीबी डेटा देत आहे. २९९ रुपयांच्या प्लान प्रमाणेच यामध्ये देखील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. बीएसएनएलचा ५५५ रुपयांचा प्लान ५५५ रुपयांच्या मासिक प्लानमध्ये ५०० जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये यूजर्सला देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचाः बीएसएनएलचा ७७९ रुपयांचा प्लान यामध्ये कंपनी महिन्याला ७७९ जीबी डेटा देत आहे. यूजर्स कोणत्याही लिमिटशिवाय एका दिवसाला देखील हा डेटा वापरू शकता. प्लानमध्ये १० एमबीपीएस डेटा स्पीड मिळेल. प्लानची खास गोष्ट म्हणजे यात डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. तसेच, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. बीएसएनएलचा ९४९ रुपयांचा प्लान या प्लानमध्ये महिनाभरासाठी ११०० जीबी डेटा मिळतो. हा डेटा एका दिवसात देखील वापरू शकता. यात अनलिमिटेड कॉलिंगसह डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. बीएसएनएलचा १२९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान DSL ब्रॉडबँडच्या ज्या यूजर्सला स्टेटिक आयपीची गरज आहे, ते या प्लानला सबस्क्राइब करू शकतात. या प्लानमध्ये तुम्हाला १० एमबीपीएस स्पीडने १६०० जीबी डेटा मिळेल. स्टेटिक आयपीसाठी यूजर्सला दरवर्षी २००० रुपये द्यावे लागतील. इतर प्लानप्रमाणेच यात देखील अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. वाचा: वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kWZt33

Comments

clue frame