नवी दिल्ली : रियलमीने यावर्षीच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच केली होती. या सीरिज अंतर्गत आणि ८ प्रो या स्मार्टफोन्सला ४ जी आणि ५जी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले होते. या फोन्सची किंमत १५ ते २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. आता कंपनी या सीरिज अंतर्गत ला देखील लवकरच भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. वाचाः अधिकृत लाँचिंगआधी रियलमी ८एस स्मार्टफोन्सचे डिझाइन आणि काही प्रमुख फीचर्स लीक झाले आहेत. 8s स्मार्टफोनबाबत समोर आलेल्या माहितीबाबत जाणून घेऊया. रियलमी लवकरच मिड-रेंज स्मार्टफोन रियलमी ८एस ला लाँच करू शकते. टिप्स्टर ऑनलीक्स आणि ९१ मोबाइल्सने फोनच्या डिझाइनला लीक केले आहे. लीक झालेल्या डिझाइनवरून लक्षात येते के फोनच्या बॅक पॅनेलवर फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरा देण्यात आले असून, याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सल आहे. फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५ इंच डिस्प्ले मिळेल. रिपोर्टनुसार, फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ८१० चिपसेटसह ६ जीबी/८ जीबी रॅम आणि ५ जीबी व्हर्च्यूल रॅम सपोर्ट मिळेल. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइडला फिंगरप्रिंट सेंसर, डाव्या बाजूला वॉल्यूम बटन तर उजव्या बाजूला पॉवर बटन आणि सिम ट्रे असेल. फोन ५जी सपोर्टसह येईल व यात १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या खालील बाजूला स्पीकर ग्रिल, ३.५ मिलीमीटर हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळू शकते. यात ३३ वॉट पास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्याप लाँचिंगची माहिती देण्यात आलेली नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fbBCZK
Comments
Post a Comment