एका सेकंदात ११४ कोटी रुपयांच्या फोनची विक्री, रियलमीच्या या स्मार्टफोनने उडवली धमाल

नवी दिल्लीः रियलमीने गेल्या आठवड्यात आपल्या होम मार्केट चीन मध्ये स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात लाँच केला जावू शकतो. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी या फोनचा एक फोटो पोस्ट केला आहे. भारतीय लाँचिंग आधी यासंबंधी मोठी माहिती समोर आली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, चीनमध्ये या फोनला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चीनमध्ये अवघ्या एका सेकंदात ११४ कोटी रुपयांच्या फोनची विक्री झाली आहे. वाचाः चीनमध्ये फोनचा पहिला सेल मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. च्या रिपोर्टनुसार, सेल सुरू होण्याच्या अवघ्या एका सेकंदात १०० मिलियन युआन जवळपास ११४ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. रियलमी जीटी मास्टर एक्सप्लोरर एडिशन दोन व्हेरियंट मध्ये आणले आहे. 8GB रॅम प्लस 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत २७९९ युआन म्हणजेच ३२ हजार रुपये आहे. तर 12GB रॅम प्लस 256GB स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २७९९ युआन जवळपास ३५ हजार ५०० रुपये आहे. वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये Realme GT Master Explorer Edition कंपनीचा एक स्वस्त फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे. जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ७ जीबी व्हर्च्युअल मेमरी सुद्धा मिळते. फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स, VC लिक्विड कूलिंग आणि हीट कमी करण्यासाठी स्पेशल कॉपर अलॉय डिझाइन मिळते. वाचाः फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्सर, १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे. जी 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zKJTvF

Comments

clue frame