जिओ समोर एअरटेलचा स्वस्त प्लान फेल, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळेल ६ जीबी डेटा आणि मोफत कॉलिंग

नवी दिल्ली : भारतातील नंबर वन टेलिकॉम कंपनी आहे. जिओकडे कमी किंमतीत येणारे अनलिमिटेड कॉल आणि डेटा ऑफर करते. तर दुसरीकडे एअरटेलने भारतात आपला स्वस्त ४९ रुपयांचा प्लान बंद केला आहे. यामुळे ज्या ग्राहकांना नंबरवरील इनकमिंग कॉल सुरू ठेवायचे आहेत त्यांना ७९ रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. याच प्राइस रेंजमध्ये ७५ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. या दोन्ही प्लान्समध्ये कोणता सर्वोत्तम आहे जाणून घेऊया. वाचाः चा ७५ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये एका रिचार्जवर एक प्लान मोफत दिला जात आहे. म्हणजेच, ग्राहकांना ७५ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण ५६ दिवसांची वैधता मिळते. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ६ जीबी डेटा आणि ५० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लान जिओफोन यूजर्ससाठी आहे. चा ७९ रुपयांचा प्लान एअरटेलटच्या या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये ६४ रुपये टॉकटाइम, २०० जीबी डेटा मिळतो. यामध्ये ग्राहकांना डबल डेटासह ४ पट अधिक आउटगोइंग मिनिटं मिळतात. या प्लानमध्ये कॉलिंगसाठी प्रति सेकंद १ पैसा शुल्क आकारले जाते. जिओ आणि पैकी कोणाचा प्लान सर्वोत्तम ? जिओच्या ७५ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तर एअरटेलच्या प्लानमध्ये कॉलिंगसाठी प्रति सेकंद १ पैसा शुल्क आकारले जातात. यामुळेच जिओचा प्लान फायद्याचा ठरतो. तर जिओच्या प्लानची कंमत देखील एअरटेलच्या प्लानच्या तुलनेत कमी आहे. मात्र, लक्षात घेण्याची बाब म्हणजे जिओचा ७५ रुपयांचा प्लान फक्त जिओफोन यूजर्ससाठी आहे. तर एअरटेलचा ७९ रुपयांचा प्लान सर्व ग्राहकांसाठी आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zYbdX5

Comments

clue frame