नोकिया देणार सॅमसंग-अ‍ॅपलला टक्कर, लाँच करणार आपला पहिला टॅबलेट; पाहा किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : यावर्षी भारतात नोकिया, रियलमी, ओप्पो सारख्या कंपन्या आपले नवीन प्रोडक्ट लाँच करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नोकिया, रियलमी आणि ओप्पो सेगमेंटमध्ये एंट्री करत , आणि एमआयला टक्कर देणार असल्याची चर्चा आहे. आता लवकरच आपला पहिला टॅबलेट लाँच करणार असल्याची माहिती समोर आली आहे. लाँचिंगच्या आधी टॅबलेटच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: T20 Tablet च्या संभाव्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर या डिव्हाइसला २ वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल, जे वाय-फाय आणि ४जी मॉडेल असेल. निळ्या रंगात या टॅबलेटला लाँच केले जाणार असून, यामध्ये १०.३६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले मिळू शकता. लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम आणि पॉवरफूल प्रोसेसरसह यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. नोकियाच्या या टॅबलेटमध्ये शानदार कॅमेरा देखील मिळू शकतो. किती असेल किंमत ? टी२० टॅबलेटला यूरोपियन देशांसह आशियातील यूएई आणि अन्य बाजारात सर्वात आधी लाँच केले जाईल. टॅबलेटच्या संभाव्य किंमतीविषयी सांगायचे तर याच्या ४जी व्हेरिएंटची किंमत जवळपास २०,८६० रुपये असेल. तर वाय-फाय व्हेरिएंटची किंमत १९,१४० रुपये असू शकते. कंपनी या टॅबलेटला सप्टेंबर अथवा ऑक्टोबरमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात नोकिया एक्स सीरिजचे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स देखील लाँच होणार आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BQKFsI

Comments

clue frame