BlackBerry चाहत्यांसाठी गुड न्यूज, लवकरच 5G टेक्नोलॉजीसोबत कमबॅक

नवी दिल्लीः कधी काळी प्रीमियम स्मार्टफोन्स बनवणारी प्रसिद्ध मोबाइल कंपनी ब्लॅकबेरी () पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करण्याची तयारी करीत आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, ब्लॅकबेरी आपल्या नवीन कंपनी OnwardMobility अंतर्गत हा स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. ब्लॅकबेरीचा फोन आपल्या qwerty कीपॅडसाठी खूप प्रसिद्ध झाला होता. आता एक ५जी फोन उतरण्याची तयारी करीत आहे. ऑनवर्ड मोबिलिटीने आता Pre-commitment Program मध्ये घोषणा केली आहे की, कंपनीचा नवीन ब्लॅकबेरी हँडसेट लाँच करणार आहे. वाचाः हे पहिल्यांदा होत नाही. नवीन ब्लॅकबेरी फोन संबंधीत नेहमी माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षी सुद्धा रिपोर्ट समोर आले होते की, ब्लॅकबेरी यूरोप आणि नॉर्थ अमेरिका मध्ये कमबॅक करणार आहे. आता लेटेस्ट रिपोर्ट मध्ये म्हटले की, नवीन ब्लॅकबेरी फोन आशियात लाँच करणार आहे. नवीन स्मार्टफोन मध्ये सिक्योरिटी फीचर्सचे खास लक्ष ठेवण्यात आले आहे. सोबत यात टॉप-ऑफ-द लाइन कॅमेरा हार्डवेयर दिला आहे. वाचाः दुसऱ्यांदा करणार कमबॅकचा प्रयत्न ही दुसरी वेळ आहे. जी ब्लॅकबेरी फोन्सची मार्केट मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओरिजनल मॅन्यूफॅक्चरररने २०१६ मध्ये आपले प्रोडक्शन बंद केले होते. यानंतर २०१६ मध्ये TCL ने ब्लॅकबेरीचे राइट्स खरेदी केले होते. यानंतर ४ डिव्हाइस लाँच केले होते. परंतु, त्यात यश मिळाले नाही. आता पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत. कंपनी नवीन फोन कधी पर्यंत लाँच केले जाणार आहे, याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BOh1UR

Comments

clue frame