नवी दिल्ली. कंपनी चांगले कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स ऑफर करण्यावर सध्या लक्ष केंद्रित करत आहे. याअंतर्गत टेलिकॉम ऑपरेटर एअरटेलने आपल्या ७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केला आहे. आता हा प्लान दुप्पट डेटासह ग्राहकांना आउटगोइंग मिनिटांच्या चारपट ऑफर करीत आहे. एन्ट्री -लेव्हल रिचार्ज एअरटेल ग्राहक आता आपल्या खात्यातील शिल्लकची चिंता न करता अधिक काळ मित्र- कुटुंबाच्या संपर्कात राहू शकतील. टेलिकॉम ऑपरेटरने सांगितले की, आता कंपनीच्या प्रीपेड पॅकची किंमत ७९ रुपयांच्या स्मार्ट रिचार्ज प्लान पासून सुरू आहे. यात २०० MB डेटा आणि ६४ रुपयांचा टॉकटाइम मिळत असून हा प्लान २८ दिवसांसाठी वैध आहे. वाचा: या व्यतिरिक्त एअरटेलने ४९ रुपयांचे एन्ट्री लेव्हल प्रीपेड रिचार्जही बंद केले आहे. ४९ रुपयांच्या एअरटेल स्मार्ट रिचार्ज प्लानमध्ये ग्राहकांना ३८.५२ रुपयांचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा मिळायचा. प्रदान केलेला १०० MB डेटा संपला की युजर्सडून प्रति एमबी ०.५० रुपये आकारले जायचे . हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येत असून २९ जुलैपासून लागू करण्यात येईल. याशिवाय कंपनीने नुकताच एक नवीन ४५६ रुपयांचा प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे, जो एकूण ५० जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग बेनिफिट्स आणि दररोज १०० एसएमएससह येतो. हा पॅक ६० दिवसांच्या वैधतेसह येत असून डेटावर दररोज कोणतीही मर्यादा नाही. यात Amazon प्राईम व्हिडिओ मोबाइल एडिशनमध्ये एका महिन्यासाठी विनामूल्य प्रवेश देखील समाविष्ट आहे. ४५६ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम, विनामूल्य हॅलोट्यून्स, व्यंक म्युझिक, शॉ अॅकॅडमी एक वर्षासाठी, अपोलो कॅशबॅक सारखे बेनिफिट्स देखील मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zIIMML
Comments
Post a Comment