नवी दिल्लीः तुम्ही जर गेमिंगचे चाहते असाल तर तुम्हाला नेहमी पॉवरफुल बॅटरीचे स्मार्टफोनची गरज आहे. सध्या अनेक कंपन्या 5000mAh पासून 6000mAh पर्यंतच्या बॅटरीचे फोन लाँच करीत आहेत. तुम्हाला जर मोठ्या बॅटरीचा स्मार्टफोन हवा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगनने आपला लेटेस्ट फोन Galaxy F22 च्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ही आहे ऑफर Samsung च्या अधिकृत वेबसाइटच्या माहितीनुसार, वर एक हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड पेमेंटवरून करावे लागेल. या ऑफर नंतर या फोनची किंमत ११ हजार ४९९ रुपये होईल. फोनची फीचर्स Samsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंचाचा HD+ सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 700x1600 पिक्सल आहे. फोन अँड्रॉयड ११ बेस्ड One UI 3.1 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर दिला आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनचा कॅमेरा फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये Samsung Galaxy F22 क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड वाइड सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. बॅटरी आणि कनेक्टिविटी पॉवर देण्यासाठी फोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. जी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी, NFC सारखे फीचर्स दिले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lcfvGp
Comments
Post a Comment