Xiaomi यूजर्ससाठी गुड न्यूज, येत आहेत Mi आणि Redmiचे 13 नवीन फोन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. भारतसह जगातील अनेक देशांमध्ये स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री करणारी शाओमी ही कंपनी यावर्षी आपल्या युजर्सना आश्चर्याचा धक्का देणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शाओमी येत्या काही दिवसांत MI आणि Redmi ब्रँडचे १३ नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. शाओमीचे हे आगामी स्मार्टफोन बजेट आणि मध्यम श्रेणीपासून प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटपर्यंत असू शकतात. तसेच, हे काही एमआय आणि रेडमी विद्यमान मालिकेचे अपग्रेड केलेले मॉडेल असू शकतात किंवा काही नवीन मालिका देखील असू शकतात. वाचा : शाओमी भारत आणि चीनसह जगभरात सर्व १३ स्मार्टफोन २०२१ वर्षाच्या उत्तरार्धात म्हणजेच जुलै ते पुढच्या महिन्यात लाँच करणार असल्याचे समजते. Xaiomiui लीक केलेल्या माहितीनुसार, झिओमीचे आगामी स्मार्टफोन Zesu, Pissaro, Mercury, Evergo, Cupid, Evergreen, Psyche, Bestla, Cygnus, Pissaropro, Divine, Hyacinth आणि Lepus यासारख्या कोड नेमसह पाहिले गेले आहेत. या मॉडेल्समधील ६ स्मार्टफोनची संभाव्य स्पेसिफिकेशन देखील लिक झाले आहे. शाओमीचा नेक्स्ट जेनरेशन स्मार्टफोन शाओमीच्या आगामी डिव्हाइसमधील बेस्टला कोडन नावाच्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर , त्यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा उपलब्ध असेल. त्याच वेळी, १०८ मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप हायसाकिंथ मॉडेलमध्ये दिसेल. या फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह एक डिस्प्ले दिसेल. यावरून हा अंदाज बांधता येतो की, हा फोन जरा महाग असू शकतो. डिवाइन या मॉडेलला ९० हर्ट्झ डिस्प्ले रिफ्रेश रेट, अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा 64 मेगापिक्सल, प्रायमरी रीअर कॅमेरा, एक्स अल्ट्रावाइड कॅमेरा आणि एक्स टेलिफोटो कॅमेरा यासारखी मस्त वैशिष्ट्ये मिळतील. उत्कृष्ट वैशिष्ट्ये झिओमीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये कोडित नावाच्या लेपस मॉडेलच्या संभाव्य वैशिष्ट्यांविषयी लीक झालेल्या माहितीमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी रीअर कॅमेरा, ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले, अल्ट्रावाइड कॅमेरा, ५ एक्स टेलिफोटो कॅमेरा आणि इन-स्क्रीन सेल्फी कॅमेरा यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल. दुसरीकडे मर्क्युरी कोड नेम मॉडेलच्या वैशिष्ट्यांविषयी सांगायचे तर यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले, ग्रेट रीअर कॅमेरा, अल्ट्रावाइड कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेरा अशी वैशिष्ट्ये असतील. तर, शाओमीच्या आगामी सिग्नस मॉडेलमध्ये ९० हर्ट्झचा डिस्प्ले रीफ्रेश रेट, इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा, १०८ मेगापिक्सल प्रायमरी रीअर कॅमेरा, अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ५ एक्स टेलिफोटो कॅमेरा अशी वैशिष्ट्ये मिळतील. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dgPocA

Comments

clue frame