नवी दिल्ली : ने यूजर्ससाठी '' रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरमुळे पाठवण्यात आलेल्या फोटो अथवा व्हिडीओंना केवळ एकदाच पाहता येईल. एकदा फोटो/व्हिडीओ पाहिल्यानंतर चॅटमधून आपोआप गायब होईल. WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या बीटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. केवळ अँड्राइड डिव्हाइससाठी रोल आउट केले आहे. वाचाः कसे काम करेल फीचर ?
- मध्ये फोटो/व्हिडीओ पाठवण्यासाठी यूजला आधी मीडियाची निवड करावी लागेल. त्यानंतर क्लॉक-लाइक आयकॉनवर टॅप करावे लागे. हे 'Add a caption' बार जवळ उपलब्ध असेल. रिसिव्हरने फाइल उघडल्यावर सेंडरला त्याची माहिती मिळते.
- एकदा फाइल उघडून पाहिल्यानंतर त्याखाली मेसेज लिहिलेला असेल. त्यात ‘हा फोटो एकदा पाहण्यासाठी सेट करण्यात आला आहे. गोपनियतेसाठी तुम्ही चॅट बंद केल्यानंतर फोटो गायब होईल’, असे लिहिलेले असेल.
- रिपोर्टनुसार, जर अशा मेसेजसाठी read receipts बंद केले असेल तर रिसिव्हरला मेसेस view once साठी ओपन केले आहे की नाही हे समजेल. मात्र, सेंडरला रिसिव्हरने मेसेज कधी बघितला हे समजणार नाही.
- ग्रुप चॅटसाठी व्हॉट्सअॅप यूजर्स इतरांनी फोटो कधी पाहिला हे पाहू शकतील.
- जर रिसिव्हरने फोटो/व्हिडीओचा स्क्रिनशॉट काढल्यास सेंडरला याची माहिती मिळणार नाही. कारण, यात स्क्रीनशॉट डिटेक्शन नाही.
- कॉमन ग्रुपमध्ये ब्लॉक केलेले कॉन्टॅक्ट्स देखील view once फीचरसोबत पाठवण्यात आलेले फोटो आणि व्हिडीओ पाहू शकतील. ज्या लोकांनी हे फीचर इनेबल केले नाही, ते देखील असे फोटो एकदाच पाहू शकतील.
- ही सुविधा सध्या केवळ ठराविक अँड्राइड यूजर्ससाठी रोलआउट करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप व्हर्जन २.२१.१४.३ साठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h46Env
Comments
Post a Comment