WhatsApp यूजर्सला मिळणार ‘हे’ दोन शानदार फीचर्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप चे अपडेटेड व्हर्जन २.२१.१३.१७ मध्ये यूजर्सला दोन नवीन फीचर्स मिळणार आहे. हे फीचर बीटा व्हर्जन वापरणाऱ्या यूजर्ससाठी उपलब्ध झाले असून, पुढील काही दिवसात सर्व यूजर्ससाठी रोलआउट होतील. नवीन अपडेटमध्ये यूजर्स आता कॉन्टॅक्ट्सला स्टिकर पॅक्स फॉरवर्ड करू शकणार आहेत. यूजर्स केवळ WhatsApp वरून डाउनलोड केलेलेच फॉरवर्ड करू शकतील. वाचाः आणखी एक बदल हा डिझाइनसंदर्भातील आहे. WhatsApp ने वॉयस नोटला रिडिझाइन केले आहे. याआधी वॉयस नोटमध्ये प्ले/पॉझ बटनच्या बाजूला सरळ लाइन दिसत असे. मात्र आता वॉयस नोट सुरू असताना यूजर्सला वेवफॉर्म (waveform) दिसेल. जर तुम्ही बीटा व्हर्जन वापरत असाल तर हे फीचर वापरू शकता. वाचाः दरम्यान, यूजर्सला आधीपासूनच WhatsApp स्टिकर पॅक्स फॉरवर्ड करता येत आहे. जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर आहे की नाही, हे पाहायचा असेल तर मध्ये जाऊन स्टिकर पॅक निवडा. येथे जर तुम्हाला स्टिकर पॅकवर फॉरवर्ड बटन दिसत असेल, तर हे फीचर तुमच्या अकाउंटवर उपलब्ध आहे. फॉरवर्ड बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीला स्टिकर पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करून पाठवू शकता. यानंतर WhatsApp यूजर्सला लिंक पाठवेल व स्टिकर पॅक डाउनलोड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A2OR7Z

Comments

clue frame