Walk-in Covid Vaccine Campमध्ये लस घेतांना या गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली. राज्य सरकारांनी कोविड-१९ लसीकरण शिबिरांना वॉक-इन करण्यास परवानगी दिली आहे. पण,या सोबत फसवणूक करणारेही सक्रिय झाले आहेत. बनावट लसीकरणाची प्रकरणे देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही जर वॉक-इन कोविड लस शिबिरात जात असाल तर सावधगिरी बाळगणे असणे आवश्यक आहे. कसे ते जाणून घ्या. वाचा : राज्य सरकार Covid-19 लसीकरण शिबिरांना वॉक-इन करण्यास परवानगी देत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. लसीकरण प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल केलेली आहे. अगदी वॉक इन शिबिरांसाठी देखील, आणि बनावट लसी देणाऱ्या फसव्या व्यक्तींना आपण बळी पडू नये याची खात्री करण्यासाठी काही सूचना देखील दिल्या आहे. कोविन वेबसाइटवर स्लॉट बुक कराल किंवा कोविड लस मिळवण्यासाठी एखाद्या शिबिरामध्ये स्लॉट बुक केल्यावर वॉक-इन करा, त्वरित तुम्हाला योग्य डिजिटल लस प्रमाणपत्रासह क्यूआर कोडसह कोविन सिस्टमकडून एसएमएस मिळेल. आपण वॉक-इन Covid-19 लस शिबिरात जाताना या ६ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा १. आपल्या मोबाईल फोनसह आपले आधार कार्ड वॉक-इन लसीकरण शिबिरात घेऊन जावे लागेल. जर आपण कोविन वेबसाइटवर प्रथम नोंदणी न करता कोविड लस शिबिरात जात असाल तर आपल्याला आपले आधार कार्ड आणि कार्यरत मोबाइल फोन असणे आवश्यक आहे. आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक नाही, परंतु ओटीपी आणि लस प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आपल्याकडे त्या मोबाइल नंबरवर ऍक्सेस असणे मात्र आवश्यक आहे. २. लस नोंदणी सत्यापित करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला चार अंकी ओटीपी मिळेल. वॉक-इन लस कॅम्पमध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्या नोंदणीची खात्री करण्यासाठी आपल्या मोबाइल नंबरवर आपल्याला चार अंकी ओटीपी मिळेल. लस देण्यापूर्वी ही एक महत्त्वाची स्टेप आहे. जोपर्यंत आपल्याला हे ओटीपी मिळत नाही तोपर्यंत लस घेऊ नका. कोविन सिस्टमवर आपली नोंदणी पूर्ण होईपर्यंत आपण लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्यास सक्षम राहणार नाही. तसेच, ओटीपी नोंदणी प्रणाली बनावट लसीकरण शिबिरांपासून आपले संरक्षण करतो. ३. लस मिळाल्यानंतर ताबडतोब नोंदणीकृत फोन नंबरवर एसएमएस येईल. लस मिळताच तुम्हाला लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याच्या लिंकसह आपले संपूर्ण नाव, लसीचे नाव आणि वेळ यासह कोविन प्लॅटफॉर्मवरुन एसएमएस येईल. ४. क्यूआर कोड स्कॅन करून कोव्हीड प्रमाणपत्र सत्यापित करा. भारतातील सर्व कोविड लस प्रमाणपत्रे एक समर्पित क्यूआर कोडसह येतात. लसीकरण प्रमाणपत्राची वैधता कशी तपासायची
  • कोविन सत्यापन वेबसाइट- https://ift.tt/3wmqT5g भेट द्या.
  • वेबसाइटवर "स्कॅन क्यूआर कोड" क्लिक करा.
  • जारी केलेल्या प्रमाणपत्रावर कॅमेरा क्यूआर कोडवर दाखवा आणि स्कॅन करा.
  • एक लस प्रमाणपत्र क्यूआर कोड स्कॅन करण्याबद्दल " Certificate Successfully Verified" दर्शवेल आणि Name, Age, Gender, Beneficiary Reference ID, Date of Dose, Certificate Issued: Provisional/Final, Vaccination at ही माहिती दर्शवेल.
जर प्रमाणपत्र खोटे असेल तर लसीकरणाच्या प्रमाणपत्रातील क्यूआर कोड वेबसाइटवर चालणार नाही. ५. जर कोविड प्रमाणपत्र खरे नसेल तर कोव्हिन पडताळणी वेबसाइट- https://ift.tt/3wmqT5g वर "प्रमाणपत्र अवैध" दिसेल. ६. आरोग्य सेतु अ‍ॅपवर तुमची लसीकरण स्थिती तपासा लसीची अद्ययावत स्थिती तपासण्यासाठी आरोग्य सेतूवर लॉगिन करण्यासाठी समान नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा. वाचा : वाचा : वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qza8l6

Comments

clue frame