Vivoने लाँच केला आणखी दमदार स्मार्टफोन, मिळेल ५०MP+४८MP चा शानदार कॅमेरा

नवी दिल्ली : वीवोने आपला फ्लॅगशिप Vivo X60t Pro+ ला लाँच केले आहे. X६० फॅमिलीचा हा नवीन मेंबर आहे. याआधी एक्स६० सीरिजमध्ये X६०, X६० Pro, X६० Pro+ X६०t आणि X६० कर्व्ड स्क्रीन व्हर्जन लाँच झाले आहेत. विवोच्या फोनचे वैशिष्ट्ये याचा ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर क्वॉड रियर कॅमेरा आहे. एक्स६०टी प्रो प्लसमध्ये ४,२०० एमएएएचची बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. वाचाः Vivo X60t Pro+ ची किंमत Vivo X60t Pro+ ला चीनमध्ये लाँच करण्यात आले असून, याच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY ४,९९९ (जवळपास ५७,४०० रुपये) आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY ५,९९९ (जवळपास ६८,९०० रुपये) आहे. हा फोन क्लासिक ऑरेंज आणि डार्क ब्लू रंगात येतो. वीवो एक्स६०टी प्रो प्लसची विक्री कंपनीच्या वेबसाइटवर सुरू झाली आहे. वाचाः Vivo X60t Pro+ चे स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये ६.५६ इंचचा फुल एचडी+ (१०८०x२३७६ पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसोबत येतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ५० मेपाकिस्लचा प्रायमरी सेंसर, दुसरा ४८ मेगापिक्सल, तिसरा अपर्चर एफ/१.९८ लेंससोबत १२ मेगापिक्सल आणि अपर्चर एफ/३.४ सोबत ८ मेगापिक्सलचा चौथा कॅमेरा मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात अपर्चर एफ/२.४५ सोबत ३२ मेगापिक्सलची लेंस मिळेल. Vivo X60t Pro+ स्मार्टफोनच्या इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ४,२०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ५५ वॉट फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीसोबत येते. कंपनीचा दावा आहे की फोन ४जीवर १२.७ तास टॉक-टाइम आणि २७६ तास ४जी स्टँडबाय टाइम देईल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ५जी, ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ वी५.२, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळेल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला असून, हा फोन अँड्राइड ११ आधारित Origin OS १.० वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hhGHjt

Comments

clue frame