Twitter ने जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळे देश दाखवले

नवी दिल्लीः मायक्रो ब्लॉगिंग साइट ने भारताच्या ऐक्यतेवर पुन्हा एकदा वाद उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. Twitter कडून भारताच्या चुकीच्या नकाशाला आपल्या वेबसाइटवर दाखवले आहे. ज्यात ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाखला एक वेगळा देश दाखवले आहे. ट्विटर आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात आधीच मोठा वाद सुरू असताना आता ट्विटरकडून ही चूक झाली आहे. वाचाः ट्विटरने दुसऱ्यांदा दाखवला भारताचा चुकीचा नकाशा Twitterच्या करियर पेजवर Tweep Life सेक्शनवर वर्ल्ड मॅप आहे. भारताचा चुकीचा नकाशा यात दाखवला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारताच्या बॉर्डवरील दुसरा देश दाखवण्यात आले आहे. ट्विटरच्या या चुकीमुळे सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याचे काम याआधी केलेले आहे. याआधी ट्विटरने लेहला चीनचा भाग दाखवले होते. त्यावेळी केंद्र सरकारने जोरदार विरोध केल्यानंतर ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा हटवला होता. वाचाः भारताचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विटर आधीत गोत्यात आले आहे. ट्विटरने त्यांचे अकाउंट एक तासासाठी बंद केले होते. भारताच्या कायद्यामंत्र्यांचे अकाउंट बंद केले जात असल्याने ट्विटरने मनमानी सुरू केल्याचा आरोप ट्विटर करण्यात आला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UPfgpL

Comments

clue frame