Tecno Spark Go 2021 आज भारतात लाँच होणार, किंमत १० हजारांपेक्षा कमी, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः (2021). Tecno चा नवीन बजेट स्मार्टफोन Tecno Spark Go (2021) ला आज दुपारी १२ वाजता भारतात लाँच करण्यात येणार आहे. हा कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन असणार आहे. लाँचिंग आधी फोनला ई-कॉमर्स साइट Amazon लिस्ट करण्यात आले आहे. फोनची विक्री Amazon India वरून केली जाणार आहे. Tecno Spark G0 (2020)चे अपग्रेड व्हर्जन आहे. फोनला चार कलर ऑप्शन मध्ये आणले जाणार आहे. वाचाः Tecno Spark Go (2021) स्मार्टफोन मध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी 13MP AI ड्यूल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. जो फ्लॅश लाइट सपोर्ट सोबत येईल. तर फ्रंट पॅनेलवर 8MP AI सेल्फी कॅमेरा दिला आहे. जो Microslit फ्रंट फ्लॅश सोबत येईल. फोनच्या बॅक पॅनेलवर स्मार्ट फिंगरप्रिंट स्कॅनरचा सपोर्ट मिळेल. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. वाचाः टेक्नोच्या या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट सोबत अँड्रॉयड १० वर आधारित HiOS 6.2 दिला आहे. Tecno Spark Go 2020 मध्ये ६.५२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 720x1600 पिक्सल आहे. फोनमध्ये 1.8GHz चा मीडियाटेक हीलियो A20 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम सोबत ३२ जीबी स्टोरेज मिळणार आहे. मेमरी कार्डच्या मदतीने २५६ जीब पर्यंत स्टोरेज वाढवले जाऊ शकते. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून यातील मेन कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि दुसरा लेन्स एआय लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dy8YkF

Comments

clue frame