TCL ने भारतात लाँच केले तीन स्मार्ट MINI LED TV, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः ग्लोबल टॉप-2 टेलिव्हीजन ब्रँड आणि प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स कंपनी टीसीएलने भारतीय बाजारात आपली 2021 C सीरीज रेंज लाइनअप लाँच केली आहे. यात मॅजिक कॅमेरा सोबत मिनी एलईडी QLED4K C825, गेम मास्टर आणि QLED सोबत QLED 4K C728 चा समावेश आहे. जबरदस्त होम इंटरटेनमेंट अनुभवसाठी व्हिडिओ कॉल कॅमेरा सोबत 4K C725 दिले आहे. नवीन मॉडल्स मध्ये १२० हर्ट्ज एमईएमसी, डॉल्बी व्हिजन, डॉल्बी व्हिजन आयक्यू, डॉल्बी अॅटमॉस, आयमॅक्स एनहांस्ड, गेम मास्टर, हँड्स फ्री व्हाइस कंट्रोल २.० टीसीएल स्मार्ट यूआय सह अन्य फीचर्स दिले आहेत. वाचाः सी ८२५: नवा सी८२५ हा ऑलराउंडर असून तो टीव्ही पाहण्याचा अप्रतिम अनुभव, उत्कृष्ट गेमिंग किंवा मित्र, सहकारी आणि कुटुंबासोबत अखंडपणे संवाद साधण्याची सुविधा पुरवतो. सी८२५ द्वारे टीसीएल मिनी एलईडीच्या क्षेत्रात एक नवे परिवर्तन घडवून आणत असून, टीव्हीमध्ये स्ट्रेट डाउन बॅकलाइट मोड आहे. याद्वारे पारंपरिक एलईडीमधील ग्रेनसाइज लक्षणीयरित्या कमी केली जाते. यात एचडीएमआय २.१ सह गेम मास्टर हे अत्याधुनिक गेमिंग फीचरदेखील आहे. यात डॉल्बी अॅटमॉससह आयमॅक्सवर्धित सर्टिफाइड २.१ इंटिग्रेटेड ऑनक्यो साउंडबार असून त्यात बिल्ट-इन सबवूफर आहेत. डॉल्बी अॅटमॉसद्वारे, श्रोत्यांना समृद्ध आणि अप्रतिम ध्वनीच्या लाटेचा अनुभव मिळतो. हे टीव्ही ५५ आणि ६५ इंचप्रकारात उपलब्ध असून ते अनुक्रमे ११४,९९० रुपये आणि १४९,९९० रुपयांत उपलब्ध आहेत. वाचाः सी७२५: सी७२५ द्वारे घरगुती मनोरंजन देणाऱ्या डिव्हाइसचा अनुभव देण्याकरिता आकर्षक फीचर्स आहेत. व्हिडिओ कॉल कॅमेऱ्याद्वारे यूझर्स क्यूएलईडी डिस्प्लेवर गूगल ड्युओद्वारे व्हिडिओ कॉलिंगचा आनंद तुम्हाला घेता येतो. पिक्चरसाठी तो डॉल्बी व्हिजन, एचडीआर १०+ टेक्नोलॉजी, ४के रिझोल्युशन, एआयपिक्यू इंजिन असून तो अप्रतिम पिक्चरसाठी एमईएमसी आणि एचडीएमआय 2.1 ला सपोर्ट करतो. टीव्हीत डॉल्बी ऍटमॉससह ऑनक्यो प्रमाणित साउंडबार आहेत. स्मार्ट फीचरच्या बाबतीत, सी७२५ हा टीव्ही टीसीएल स्मार्ट यूआयसह ऑपरेट होतो. यात टीसीएल होम एंटरटेनमेंट सेंटरचा समावेश आहे. यात टीसीएल चॅनेल ३.० मध्ये यूझर्सना सर्व प्रकारच्या ग्लोबल आणि लोकल कंटेंटचा आनंद लुटता येतो. हा टीव्ही ५०, ५५ आणि ६५ इंच प्रकारात असून तो अनुक्रमे ६४,९९० रुपये, ७२,९९० रुपये आणि ९९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. वाचाः सी७२८: भव्य स्क्रीनवर उत्कृष्ट गेमिंगसाठी तयार केलेला सी७२८ हा टीव्ही सर्व गेमर्ससाठी टीसीएलची प्रीमियम ऑफरिंग आहे. यात एचडीएमआय २.१ समर्थित गेम मास्टर आहेत. तसेच व्हेरिएबल रिफ्रेश रेट, ऑटो लो लॅटन्सी मोड, ईएआरसी आणि कंपनीच्या मालकीचे सॉफ्टवेअर अल्गोरिदम यासारखे तंत्रज्ञान आधारीत घटक आहेत. याद्वारे गेमर्सना उत्कृष्ट गेमिंग अनुभव मिळेल. यात क्यूएलईडी डिस्प्ले टेक्नोलॉजी असून याद्वारे १०० % कलर व्हॉल्यूम मिळतो आणि पाहण्याचा अधिक चांगला अनुभव मिळतो. या उपकरणात १२० हर्ट्झ एमईएमसीची सुविधा आणि यूझरच्या नियंत्रणासाठी टीव्हीला सोप्या आणि थेट व्हॉइस कमांड्सद्वारे हँड्स फ्री व्हॉइस कंट्रोलची सुविधा मिळते. हा टीव्ही ५५, ६५ आणि ७५ इंच प्रकारात उपलब्ध असून तो अनुक्रमे ७९,९९० रुपये; १०२,९९० रुपये आणि १५९,९९० रुपयांत उपलब्ध आहे. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jsEMex

Comments

clue frame