नवी दिल्ली. Smartwatch काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या स्मार्टवॉचचा प्रथम सेल आज दुपारी १२ वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरु करण्यात येणार आहे या स्मार्टवॉचमध्ये बरीच खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यात अतिरिक्त रक्त ऑक्सिजन संतृप्ति किंवा एसपी २ देखरेखीचा समावेश आहे. त्याशिवाय यामध्ये ११७ स्पोर्ट्स मोड्स देण्यात आले आहेत. वाचा : Mi Watch Revolve Active Smartwatch किंमत आणि ऑफरः Mi Watch Revolve Active Smartwatchची किंमत ९,९९९ रुपये आहे. आजपासून दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाइट Amazon इंडिया, कंपनीची अधिकृत वेबसाइट एमआय डॉट कॉम, एमआय होम स्टोअर्स आणि इतर विक्रेता यांच्यामार्फत ही वॉच तुम्हाला खरेदी करता येईल. हे घड्याळ सेल अंतर्गत ८,२४९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तसेच, एचडीएफसी बँकेची ऑफरही दिली जात आहे. या बँकेच्या डेबिट कार्डाद्वारे पेमेंट करणाऱ्या वापरकर्त्यांना ७५० रुपयांची सूट देण्यात येईल. ही वॉच बेज, ब्लॅक आणि नेव्ही ब्लू वॅट केसमध्ये खरेदी केले जाऊ शकते. यात ६ रंगाचे बेल्ट्स असतील. Mi Watch Revolve Active Smartwatch वैशिष्ट्ये: यात सिलिकॉन बेल्स आहे. या व्यतिरिक्त चांगल्या ग्रिपसाठी बकल देखील दिले गेले आहे. या स्मार्टवॉचमध्ये, एखादी व्यक्ती त्याच्या रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशन (एसपीओ २) चे परीक्षण करू शकते. यासह, हृदय गती, स्लिप आणि तणाव पातळी देखील यावर लक्ष ठेवता येते. इतकेच नाही. तर, त्यात व्हीओ २ मॅक्स सेन्सर देण्यात आला आहे. हे वॉच तुम्हाला वर्कआउट दरम्यान मदत करेल. जास्तीत जास्त ऑक्सिजनचा वापर मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या घड्याळात ११७ हून अधिक स्पोर्ट मोड्ससह ११० फेस वॉचेस देण्यात आले आहेत. तसेच डिफॉल्ट जीपीएस देखील आहे. हे ५ATM वॉटर-रेझिस्टन्स वैशिष्ट्यासह येते . यात १२ एनएम प्रक्रिया एरोहा जीपीएस चिप देण्यात आली आहे. तसेच १.३९ इंचाइव्हर्स-ऑन एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे, रिझोल्यूशन ४५४x ४५४आहे. Mi Watch Revolve Active Smartwatch डिव्हाईस मॅग्नेटिक चार्जिंग पॉडसह लाँच करण्यात आले असून यात ४२० एमएएच बॅटरी आहे. कंपनीचा असा दावा आहे की, वॉचचा सामान्य वापराचा कालावधी १४ दिवसांपर्यंत आहे. लाँग बॅटरी मोड अंतर्गत, २२ दिवसांपर्यंतची बॅटरी दिली जाते. याशिवाय बॉडी एनर्जी मॉनिटर, कॉल आणि टेक्स्ट नोटिफिकेशन, म्युझिक कंट्रोल, इन-बिल्ट अलेक्सा सपोर्ट, स्टॉपवॉच, अलार्म, टाइमर, फाइन्ड माय फोन, टॉर्च इत्यादी वैशिष्ट्ये देखील यात देण्यात आली आहेत. वाचा : वाचा : वाचा :
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vVFXG2
Comments
Post a Comment