Samsung Galaxy M32 दमदार स्मार्टफोनचा पहिला सेल आज, खूपच कमी किंमतीत खरेदीची संधी

नवी दिल्ली : ने काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनला भारतात लाँच केले होते. या स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी, मीडियाटेक हेलियो जी८० प्रोसेसर, क्वाड रियर कॅमेऱ्यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. भारतीय बाजारात स्मार्टफोनची , आणि Realme 8 5G सारख्या फोनशी टक्कर असेल. जर फीचर्स पाहून तुमचा हा फोन खरेदी करण्याचा विचार असेल तर आज दुपारी १२ वाजल्यापासून फोनची विक्री सुरू होत आहे. या फोनची किंमत आणि ऑफर्स जाणून घेऊया. वाचाः Samsung Galaxy M32 ची किंमत आणि ऑफर्स: Samsung Galaxy M32 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. फोन ब्लॅक आणि लाइट ब्लू रंगात येतो. फोनला ई-कॉमर्स वेबसाइट , Samsung India ची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोर्सवर खरेदी करता येईल. फोनवर ICICI बँक यूजर्सला १,२५० रुपये कॅशबॅक मिळेल. वाचाः Samsung Galaxy M32 चे फीचर्स: हा ड्यूल सिम सपोर्टसह येतो. हा अँड्राइड ११ वर आधारित One UI ३.१ वर काम करतो. Samsung Galaxy M32 स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोनमध्ये २५ वॉट सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल आहे. दुसरा सेंसर ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, तिसरा २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ३.५mm हेडफोन जॅक इत्यादी फीचर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jiH2oH

Comments

clue frame