नवी दिल्ली : कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स असणारा फोन यावा असे प्रत्येकाला वाटत असते. तुम्ही देखील असाच फोन शोधत असाल तर 7 Pro चांगला पर्याय ठरू शकता. या फोनवर बंपर सूट मिळत असून, ऑफरचा आज शेवटचा दिवस आहे. रियलमीच्या या फोनवर तब्बल ४ हजार रुपये सूट मिळत आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात. वाचा : Realme 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स रॅम, स्टोरेज व प्रोसेसर: ७ प्रो मध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ७२९G SoC सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो ६१८ जीपीयू देण्यात आला आहे. यात ८ जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबीपर्यंतचे स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवू शकता. डिस्प्ले: या फोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशिया ९०:८ टक्के आहे. कनेक्टिविटी: जीपीएस, वाय-फाय ८०२.११एसी, ४जी VoLTE, ए-जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि ब्लूटूथ वर्जन ५.१ सारखे फीचर्स मिळतात. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. यात ५जी सपोर्ट मिळत नाही. वाचा : कॅमेरा: रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये रियरला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा IMX६८२ प्राइमरी कॅमेरा, दुसरा ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल, पोर्टेट शॉट्ससाठी २ मेगापिक्सलचा मोनोक्राम आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर मिळेल. सेल्फीसाठी फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. बॅटरी: फोनमध्ये ४५०० एमएएचची बॅटरी मिळते, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते. कंपनीचा दावा आहे की फोन ३४ मिनिटात ० ते १०० टक्के चार्ज होईल. Realme 7 Pro ची किंमत च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर ४ हजार रुपये सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर फोनला १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी व्हेरिएंटवर ४ हजार रुपये डिस्काउंट मिळत असून, डिस्काउंटनंतर फोनला १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचा : वाचा : वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qySiyD
Comments
Post a Comment