Realme ने गुपचूप भारतात नवा स्मार्टफोन केला लाँच, किंमत ७ हजारांपेक्षा कमी

नवी दिल्लीः Realme ने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन C11 (2021) ला गुपचूपपणे लाँच केले आहे. Realme C11 स्मार्टफोन अँड्रॉयड ११ गो एडिशन सोबत येतो. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर, ६.५ मिनी एचडी प्लस मिनी ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. जाणून घ्या या फोनबद्दल. वाचाः Realme C11 (2021) ची किंमत रियलमीच्या या फोनला भारतात ६ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. या फोनला कूल ब्लू आणि कूल ग्रे कलर मध्ये आणले आहे. परंतु, लाँच ऑफर अंतर्गत या फोनला ६ हजार ७९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनला अॅमेझॉन इंडिया, Realme.com आणि ऑफलाइन स्टोर्सवरून खरेदी करू शकता. Realme C11 (2021) फोनमध्ये ६.५ इंचाचा (1600 x 720 पिक्सल) एचडी+ 20:9 मिनी-ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये १.६ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर Unisoc SC9863A प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी IMG8322 GPU दिला आहे. हँडसेट मध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवले जाऊ शकते. वाचाः ड्युअल सिमच्या या फोनमध्ये अँड्रॉयड ११ बेस्ड गो एडिशन सोबत दिले आहे. फोनमध्ये ३.५ एमएम ऑडियो जॅक, एफएम रेडिओसारखे फीचर्स दिले आहे. याशिवाय, फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/ग्लोनास, मायक्रो-यूएसबी सारखे कनेक्टिविटी फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qnRrB0

Comments

clue frame