बंपर डिस्काउंटसह खरेदी करा Realme Narzo 30 4G, आज पहिला सेल

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी ने भारतीय बाजारात कमी किंमतीत आपले दोन नवीन स्मार्टफोन्स आणि ला लाँच केले होते. यातील Realme Narzo 30 4G ची आज दुपारी १२ वाजल्यापासून विक्री सुरू होणार आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट realme.com वरून खरेदी करू शकता. या फोनची किंमत आणि यावरील ऑफर्ससह फीचर्स जाणून घेऊया. वाचाः Realme Narzo 30 4G ची किंमत आणि ऑफर्स: या फोनला दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहे. याच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये व ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,४९९ रुपये आहे. हा फोन रेसिंग ब्लू आणि रेसिंग सिल्वर रंगात येतो. यासोबत ५०० रुपये डिस्काउंट दिला जात असून, डिस्काउंटनंतर फोनला क्रमशः ११,९९९ रुपये आणि १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः Realme Narzo 30 4G चे फीचर्स: या फोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला असून, याचे रिझॉल्यूशन १ ०८०x२४०० पिक्सल आहे. याचे ९० हर्ट्ज अल्ट्रा स्मूथ डिस्प्ले, स्क्रीन टू बॉडी रेशियो ९०:५ आहे. हा फोन २.०५ गीगाहर्ट्जपर्यंतच्या क्लॉक स्पीडसह १२एनएम प्रोसेसवर आधारित मीडियाटेक हेलियो जी९५ प्रोसेसरवर काम करतो. फोनमध्ये ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. फोनमध्ये ५००० एमएएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी ३० वॉट डार्ट चार्ज सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, ६५ मिनिटात फोन १०० टक्के चार्ज होईल. यात सुपर पॉवर सेव्हिंग मोड देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचे प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल, दुसरा सेंसर २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट लेंस आहे. यात नाइट फिल्टर्स, सुपर नाइटस्केप, अल्ट्रा ४८ मेगापिक्सल मोड, पॅनोरामा, पोट्रेट मोड, टाइम लॅप्स, एडीआर, अल्ट्रा मॅक्रो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये फ्रंटला १६ मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा मिळेल. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित realme UI २.० वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jkFiv7

Comments

clue frame