अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशनसह Realme Buds Q२ लाँच, २८ तासांची बॅटरी लाइफ, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : ने भारतीय ग्राहकांसाठी स्वस्त True ला लाँच केले आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Realme Buds Q चे अपग्रेड व्हर्जन असलेल्या या इयरबड्समध्ये गेमिंगसाठी लो लेटेंसी मोड आहे. बड्सला १०एमएम ड्राइव्हर्ससोबत सादर करण्यात आले आहे. ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. वाचाः Realme Buds Q2 चे स्पेसिफिकेशन्स वरती सांगितल्याप्रमाणे ला १०एमएम ड्राइव्हर्ससोबत सादर करण्यात आले आहे. सोबतच यात कंपनीने नवीन BassBoost+ सॉफ्टवेयरचा वापर केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.२ मिळेल. कंपनीचा दावा आहे की बड्स फास्ट चार्जिंग सपोर्ट करतात व १० मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ३ तास चालेल. वाचाः लो लेटेंसी मोडसाठी ८८ms गेमिंग मोड देखील देण्यात आले आहे. वर्कआउट आणि पावसाच्या थेंबपासून देखील याला काही होत नाही व याला IPX५ रेटिंग मिळाले आहे. अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन सुरू असल्यास २० तास आणि फीचर बंद असल्यास २८ तास वापरू शकता. Realme Buds Q2 ची किंमत हे बड्स काळ्या आणि निळ्या रंगात येतात. याची किंमत २,४९९ रुपये असून, ३० जूनपासून कंपनीची अधिकृत वेबसाइटसह Amazon आणि Flipkart वर विक्री सुरू होईल. यात अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर दिल्याने याची किंमत गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Realme Buds Q पेक्षा अधिक आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sm4vdo

Comments

clue frame