नवी दिल्लीः वायर्ड ईयरफोन्सला भारतात १ जुलै रोजी लाँच केले जाणार आहे. लाँच आधीच या ईयरफोनची किंमत आणि खास फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये लाँच करण्यात आलेल्या चे अपग्रेड व्हर्जन म्हणून याकडे पाहिले जात आहे. या डिव्हाइसला फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले आहे. वाचाः Realme Buds 2 Neo ला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाँच आधी लिस्ट करण्यात आले आहे. याचे वैशिष्ट्ये सोबत डिझाइन सुद्धा पाहता येते. नवीन ईयरफोन्सची डिझाइन Realme Buds 2 सारखीच आहे. Realme Buds 2 Neo साठी कंपनीने आपल्या वेबसाइटवर सुद्धा इव्हेंट पेज लाइव्ह केले आहे. याला Realme Beard Trimmer आणि Realme Hair Dryer सोबत लाँच केले जाणार आहे. फ्लिपकार्टच्या लिस्टिंगनुसार, Realme Buds 2 Neo ची किंमत ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या या लिस्टिंगमध्ये कमिंग सून लिहिले आहे. वाचाः कंपनीने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. Realme Buds 2 Neo ईयरफोनला १ जुलै रोजी १२.३० वाजता लाँच केले जाणार आहे. याला ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये लाँच केले जाणार आहे. या डिव्हाइस मध्ये ११.२ एमएम डायनामिक ड्रॉयव्हर्स दिले आहे. हे ड्रॉयव्हर्स डीप बेस ऑफर सोबत येते. बड्स सोबत १ मीटर लांब टँगल फ्री केबल येतो. याला केबलमध्ये माइक सोबत इन लाइन रिमोट सुद्धा आहे. इनलाइन रिमोट मध्ये सिंगल बटन दिले आहे. याचा वापर अनेक फंक्शनसाठी केला जाऊ शकतो. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3w57zIH
Comments
Post a Comment