नवी दिल्ली : ने गेल्या महिन्यात आपला पहिला ५जी POCO M3 Pro ला भारतीय बाजारात सादर केले होते. आता कंपनीच्या आणखी एका डिव्हाइसला ब्यूरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स () वर पाहण्यात आले आहे. हा फोन असण्याची शक्यता आहे. मात्र लिस्टिंगमध्ये आगामी डिव्हाइसच्या फीचर्सबाबत माहिती मिळालेली नाही. वाचाः एका रिपोर्टनुसार, अपकमिंग Poco F3 GT स्मार्टफोन M2104K10C मॉडल नंबरसोबत बीआयएस वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. या स्मार्टफोनला २०२१ च्या तिसऱ्या तिमाही लाँच केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त अद्याप फोनबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Poco F3 GT चे संभाव्य स्पेसिफिकेशन आतापर्यंत समोर आलेले रिपोर्टनुसार, Poco F3 GT स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंच एमोलेड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचा रिफ्रेश १२० हर्ट्ज असेल. हा डिव्हाइस अँड्राइड ११ वर आधारित MIUI १२.५ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. या हँडसेटमध्ये साइड-माउटेंड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. Poco F3 GT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकता. याचा प्रायमरी सेंसर ६४ मेगापिक्सल, दुसरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तिसरा २ मेगापिक्सलची मॅक्रो लेंस असेल. सेल्फीसाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. अन्य फीचरमध्ये ५,०६५ एमएएचची दमदार बॅटरी मिळू शकते, जी ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. या व्यतिरिक्त वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी पोर्ट सारखे फीचर्स मिळतील. वाचाः Poco F3 GT ची संभाव्य किंमत पोकोने अद्याप या फोनच्या भारतातील लाँचिंग, किंमत, फीचरबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लिक झालेल्या रिपोर्टनुसार, Poco F3 GT ची किंमत २५ ते ३० हजार रुपये असू शकते. दरम्यान, Pro स्मार्टफोनची किंमत १७९ यूरो (जवळपास १६ हजार रुपये) आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच FHD+ LCD डॉट-डिस्प्ले मिळतो. यात ११००1100 nits पीक ब्राइटनेस, ९०Hz रिफ्रेश्ड रेटसोबत DynamicSwitch फीचर मिळते. यात MediaTek Dimensity ७०० SoC देण्यात आला असून, Mali-G५७ MC२ GPU सपोर्ट मिळेल. फोन अँड्राइड आधारित MIUI १२ वर काम करतो. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UHZpsT
Comments
Post a Comment