नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट प्लेटफॉर्म पेटीएम (Paytm) ने एलपीजी सिलेंडरबाबत अनेक सर्व्हिसेज आणि ऑफर्स अॅड केल्या आहेत. यूजर्स आता आयव्हीआर, मिस्ड कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचे पेमेंट थेट द्वारे करू शकतात. बुक केल्यानंतर काही तासांनी देखील पेटीएमवरून पेमेंट करता येईल. वाचा : ३ सिलेंडर बुकिंगवर ९०० रुपये कॅशबॅक कंपनी पहिल्यांदा बुक करणाऱ्या ग्राहकांना ३ सिलेंडर बुकिंगवर ९०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. पेटीएमवरून बुक करण्यात आलेल्या प्रत्येक सिलेंडरवर एश्योर्ड पेटीएम फर्स्ट प्वाइंट्स देखील मिळेल. हे प्वाइंट्स ग्राहक वॉलेट बँलेस म्हणून रीडिम करू शकतात. ही ऑफर इंडेन, एचपी गॅस आणि भागत गॅसच्या सिलेंडर बुकिंगवर मिळत आहे. वाचा : नंतर देऊ शकता सिलेंडरचे पैसे ग्राहकांकडे पेटीएम पोस्टपेडवर इनरॉल केल्यानंतर सिलेंडर बुकिंगवर पे लेटरचा पर्याय देखील असेल. म्हणजेच सिलेंडर खरेदी केल्यानंतर काही दिवसांनी पैसे देऊ शकतात. गॅस डिलिव्हरी करता येणार ट्रॅक पेटीएम अॅपवर आता यूजर्सल आपल्या गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीला देखील ट्रॅक करू शकता. यासोबतच, सिलेंडरला रिफिल करण्यासाठी आपोआप रिमाइंडर देखील मिळेल. पेटीएमवरून असे बुक करा सिलेंडर
- यासाठी सर्वात प्रथम पेटीएम अॅपला डाउनलोड करा. त्यानंतर होम पेजवर Show more वर क्लिक करा.
- येथे डाव्या बाजूला असलेला Recharge and Pay Bills पर्याय निवडा.
- आता Book a Cylinder आयकॉनवर क्लिक करा.
- गॅस विक्रेत्याची निवड करा. येथे तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅसचा पर्याय मिळेल.
- गॅस विक्रेत्याची निवड केल्यानंतर रजिस्टर मोबाइल नंबर अथवा एलपीजी आयडी टाका.
- यानंतर Proceed बटवर क्लिक करून पेमेंट करा. यानंतर तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hgBdFx
Comments
Post a Comment