Mi 11 Lite चा पहिला सेल आज, कंपनी देते आहे डिस्काउंट ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्लीः Xiaomi च्या लेटेस्ट स्मार्टफोन ला आज २८ जून २०२१ रोजी पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. आज दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स साइट Flipkart आणि कंपनीची वेबसाइट वरून याला खरेदी केले जाऊ शकते. कंपनीचा दावा आहे की, २०२१ मधील सर्वात स्लीम आणि हलका Mi 11 Lite स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची थिकनेस 6.8 mm आहे. तर याचे वजन १५७ ग्रॅम आहे. शाओमीच्या दाव्यानुसार, Mi 11 Lite स्मार्टफोन iPhone 12 पेक्षा स्लीम आहे. वाचाः किंमत आणि ऑफर्स Mi 11 Lite ला प्री ऑर्डर केल्यानंतर १५०० रुपयांची सूट दिली जात आहे. फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी व्हेरियंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. Flipkart Axis बँक कार्डवरून खरेदी केल्यास ५ टक्के सूट मिळत आहे. फोनला १५ हजार ३०० रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदीचा पर्याय आहे. Mi 11 Lite स्मार्टफोन Tuscany Coral, Jazz Blue आणि Vinyl Black कलर ऑप्शन मध्ये आहे. वाचाः फोनची फीचर्स Mi 11 Lite मध्ये ६.५ इंचाचा एक फ्लॅट OLED पॅनेल दिला आहे. फोनला फुल एचडी प्लस अमोलेड डॉट डिस्प्ले सोबत आणले गेले आहे. फोनचे रिझॉल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. तर स्क्रीन ब्राइटनेस 500nits आहे. फोनला 90 Hz स्क्रीन रिफ्रेश्ड आणि 240 Hz टच सँपलिंग रेट सोबत आणले आहे. फोनला 10-bit डिस्प्लेचा सपोर्ट करणार आहे. प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 5 दिला आहे. वाचाः कॅमेरा आणि बॅटरी Mi 11 Lite च्या रियर पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP आहे. याशिवाय एक 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. एक 5MP चा टेलिफोटो लेंस दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा दिला आहे. Mi 11 Lite स्मार्टफोनसाठी 4G वेरिएंट मध्ये Snapdragon 732G चा वापर करण्यात आला आहे. फोन अँड्रॉयड ११ बेस्ड MIUI 11 वर काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी 4250 mAh ची बॅटरी दिली आहे. 33W फास्ट चार्जिंग सोबत येते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3A473xL

Comments

clue frame