नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी सातत्याने नवनवीन लाँच करत आहे. आता कंपनीने यूजर्ससाठी ३,४९९ रुपयांचा प्लान आणला आहे. एक वर्षाच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी तब्बल १०९५ जीबी डेटा देत आहे. ज्या यूजर्सला दररोज अधिक डेटा लागतो व वैधता अधिक हवी आहे, त्यांच्यासाठी हा प्लान सर्वोत्तम आहे. या प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः ३४९९ रुपयांचा प्लान ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी दररोज ३ जीबीच्या हिशोबाने एकूण १०९५ जीबी डेटा मिळत आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबत १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. प्लानमध्ये अॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओचा २५९९ रुपयांचा प्लान जर तुम्हाला जिओचा ३४९९ रुपयांचा प्लान महागडा वाढत असेल, तर तुम्ही २५९९ रुपयांच्या प्लानचा विचार करू शकता. ३६५ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये कंपनी दररोज २ जीबी डेटासह १० जीबी अतिरिक्त डेटा देत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, डिज्नी+ हॉटस्टार आणि जिओ जिओ अॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा २३९७ रुपयांचा प्लान जिओने या प्लानला काही दिवसांपूर्वी लाँच केले होते. कंपनीचा हा प्लान नो-डेली लिमिट सेगमेंटमध्ये येतो. यात ३६५ दिवसांच्या वैधतेसह एकूण ३६५ जीबी डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही एकादिवसात देखील वापरू शकता. या व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ अॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x0o4qG
Comments
Post a Comment