नवी दिल्ली. अलीकडेच, देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वैधता प्लान्स सादर केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच प्लान्सबद्दल सांगत आहो. ज्यात तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतील.जाणून घ्या या प्लान्सबद्दल सर्व काही. वाचा : व्होडाफोन आयडिया २५९५ रुपयांचा प्लान : व्होडाफोन आयडियाच्या २५९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. वैधतेबद्दल बोलल्यास या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये एकूण ५७४.५ जीबी डेटा उपलब्ध आहे. व्हॉईस कॉलिंगबद्दल सांगायचे तर यात विनामूल्य अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त दररोज १०० मेसेजेस उपलब्ध आहेत. अतिरिक्त फायद्यांविषयी सांगायचे तर डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीला या प्लानमध्ये १ वर्षासाठी विनामूल्य सदस्यता मिळते. या व्यतिरिक्त या योजनेत बिंग ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि व्ही मूव्हीज व टीव्ही क्लासिकमध्ये विनामूल्य प्रवेश उपलब्ध आहे. रिलायन्स जिओ २५९९ रुपयांचा प्लान: रिलायन्स जिओच्या २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये २ जीबी डेटा उपलब्ध आहे. वैधतेबद्दल बोलायचे झालयास प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. या व्यतिरिक्त १० GB अतिरिक्त हाय स्पीड डेटा देखील यात उपलब्ध आहे. या एकूण ७४० जीबी डेटा उपलब्ध आहे. तसेच, दररोज डेटाची मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेट ६४ केबीपीएसच्या वेगाने चालेल. व्हॉईस कॉलिंगबद्दल सांगायचे तर, यात विनामूल्य अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त या दररोज १०० मेसेजेस उपलब्ध आहेत. डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीला या प्लानमध्ये विनामूल्य सदस्यता मिळते. तसेच, जिओ अॅप्सची विनामूल्य सदस्यता उपलब्ध आहे. या दोन्ही प्लानची तुलना केली तर २५९९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओत अधिक डेटा मिळत आहे. या प्लानमध्ये एकूण ७४० जीबी डेटा उपलब्ध आहे. या दोन्ही प्लानमध्ये डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीची विनामूल्य सदस्यता उपलब्ध असून जीओचा प्लान ग्राहकांसाठी अधिक चांगला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qyKpJQ
Comments
Post a Comment