Jio ला टक्कर देण्यासाठी VI चा मोठा निर्णय, आता या प्लानमध्ये जास्त डेटा आणि वैधता

नवी दिल्ली : ने आपल्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये मोठा बदल केला आहे. ने नवीन प्रीपेड प्लान्स आणल्यापासून इतर कंपन्या देखील जुन्या प्लान्समधील बेनेफिट्स वाढवत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्हीआयने आता १९९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहे. कंपनी आता या प्लानमध्ये अधिक डेटा आणि वैधता देत आहे. प्लानमध्ये बदलांबाबत एका ट्विटर यूजरने माहिती दिली असून, या प्लानमध्ये काय बदल झाले आहेत पाहुयात. वाचाः १९९ रुपयांच्या प्लानमधील जुने बेनेफिट्स कंपनी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांसाठी १ जीबी डेटा ऑफर करत असे. यासोबतच अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. Vi च्या १९९ रुपयांच्या प्लानमधील नवीन बेनेफिट्स आता कंपनी १९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता देत आहे. तसेच, १ जीबी ऐवजी १.५ जीबी डेटा ऑफर करत आहे. आता ग्राहकांना मोफत कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Vi मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन २८ दिवस मिळेल. मात्र, या प्लानमध्ये झालेला बदलांबाबत अद्याप कंपनीच्या वेबसाइट आणि अ‍ॅपवर माहिती देण्यात आलेली नाही. वाचाः Jio, ला टक्कर देण्यासाठी ४४७ रुपयांचा प्लान Vodafone Idea ने काही दिवसांपूर्वीच जिओच्या अनलिमिटेड डेली डेटा प्लानला टक्कर देण्यासाठी ४४७ रुपलान लँच केला आहे. या प्लानसोबत डेटा वापरण्यावर कोणतीही मर्यादा नसेल. ४४७ रुपयांच्या या प्लानमध्ये ६० दिवसांसाठी ५० जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएसची देखील सुविधा मिळते. याशिवाय Vi मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपचे सबस्क्रिप्शन देखील मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T4Fsfl

Comments

clue frame