Jio, Airtel आणि Vi ग्राहकांना झटका, या स्वस्त प्लानमध्ये नाही मिळणार आता 'ही' फ्री सुविधा

नवी दिल्लीः Reliance Jio, Vodafone-Idea () आणि Airtel ने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. देशात या तिन्ही दिग्गज टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये मिळणारी फ्री SMS ची सुविधा बंद केली आहे. ग्राहकांना फोनवरून मेसेजसाठी आता चार्ज द्यावा लागणार आहे. थोडक्यात स्वस्त रिचार्ज प्लान आता महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना मोठ्या चलाखीने फ्री SMS ची सुविधा बंद केली आहे. या कंपन्यांकडून लागोपाठ नवीन स्वस्त रिचार्ज प्लान दिले जात आहे. ज्यात फ्री SMS ची सुविधा मिळत नाही. वाचाः कोणत्या प्लानमध्ये नाही मिळणार एसएमएसची सुविधा ने गेल्यावर्षी ९८ रुपयांचा प्लान बंद केला होता. परंतु, कंपनीने नंतर यावर्षी या प्लानला पुन्हा लाँच केले. ज्यात फ्री SMS ची सुविधा मिळत नाही. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन सोबत १४ दिवसासाठी रोज 1.5GB डेटा मिळत आहे. वाचाः Vodafone-Idea ने नुकतेच ९९ रुपये आणि १०९ रुपयांचे दोन नवीन रिचार्ज प्लान लाँच केले होते. या दोन्ही प्लानमध्ये फ्री SMS ची सुविधा दिली जात नाही. ९९ रुपयांच्या प्लानमध्ये १८ दिवसांच्या वैधतेसोबत फ्री कॉलिंग आणि १ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. तर १०९ रुपयांच्या प्लानची वैधता २० दिवस असून रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग दिली जात आहे. वाचाः Airtel कडून १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक प्रीपेड प्लान लाँच करण्यात आला आहे. हा प्लान १९ रुपयांचा आहे. ज्यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि २ दिवसांसाठी 200MB डेटा दिला जातो. या प्लानमध्ये फ्री SMS ची सुविधा मिळत नाही. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h5Hl4x

Comments

clue frame