नवी दिल्ली : फेसबुकच्या मालकीचे फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मने ने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि कामाचे लाँच केले आहे. यूजर्स अनेक दिवसांपासून पोस्ट शेअरिंगसाठी डेस्कटॉप सपोर्टची मागणी करत होते. आता अखेर इंस्टाग्राने हे फीचर आणले आहे. आता तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्यूटरवरून देखील इंस्टाग्रामवर फोटो अथवा पोस्ट शेअर करू शकता. वाचाः Instagram च्या या फीचरचा वापर कॉम्प्यूटर किंवा मॅकवर करता येईल. मात्र, आयपॅड यूजर्सला यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. Instagram च्या डेस्कटॉप व्हर्जनवरून फोटो शेअर करताना यूजर्सला फिल्टर आणि एडिटसोबत व्हिडीओ एडिटिंगचे फीचर देखील मिळेल. डेस्कटॉप व्हर्जनवर देखील आता मोबाइल अॅपचा अनुभव मिळेल. इंस्टाग्रामच्या या नवीन अपडेटची माहिती ट्विटर यूजर Matt Navarra यांनी ट्विट करत दिली आहे. सध्या हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध नाही. इंस्टाग्रामने टेस्टिंगसाठी काही ठराविक यूजर्ससाठी हे फीचर्स उपलब्ध केले आहे. वाचाः डेस्कटॉपवरून कसे कराल पोस्ट यासाठी सर्वात प्रथम डेस्कटॉप व्हर्जनवर इंस्टाग्राम अकाउंट लॉग इन करा. यानंतर उजव्या बाजूच्या कोपऱ्यातील + आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर जो फोटो शेअर करायचा आहे तो अपलोड करा. फोटो निवडल्यानंतर वेगवेगळ्या साइजमध्ये क्रॉप करण्याचा देखील पर्याय मिळेल. यानंतर तुम्हाला फिल्टर आणि एडिटचा देखील पर्याय मिळेल. तुम्हाला यासोबत GIFs चा देखील सपोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2T24g7U
Comments
Post a Comment