काय आहे GB WhatsApp अॅप, हे वापरताना अलर्ट राहण्याची का आहे गरज, जाणून घ्या

नवी दिल्ली. मेसेजिंग Appचा उल्लेख झाला तर WhatsAppचा उल्लेख होणार नाही हे शक्यच नाही. हे App जागतिक स्तरावर अतिशय लोकप्रिय आहे. App सगळ्यांच्याच जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. वापरकर्त्यांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप नवीन आवृत्त्या लाँच होतच असतात. अशात, सध्या जीबी व्हॉट्सअ‍ॅप व्हर्जनची बरीच चर्चा होत आहे. जरी हे व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन अपडेट म्हणून प्रसारित केले जात असले तरी, ही व्हॉट्सअ‍ॅपची नवीन आवृत्ती नाही. हे पूर्णपणे भिन्न अॅप आहे. जे, वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचा : जीबी व्हॉट्सअॅप ही फॉर्क्ड व्हर्जन असून हे App WhatsApp वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणेच तशाच मेसेजिंग अॅप सुविधा प्रदान करते, ज्यावरून मेसेजिंग, व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग करता येते. वॉट्सअॅपचे हे क्लोन अॅप वापरकर्त्यांकडून त्यांच्या सोयीनुसार कस्टमाईज केले जाऊ शकते. तसेच जीबी व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सना काही अतिरिक्त फीचर्सही मिळतात. यामुळे वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप वापरणे खूप सोपे होते. परंतु, ही सोय आपल्याला खूप त्रास देखील देऊ शकते. सावधगिरी न बाळगल्यास जीबी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर धोकादायक ठरू शकतो. जीबी व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये असणारी महत्त्वाची माहिती चोरू शकतो. तसेच, मूळ व्हॉट्सअ‍ॅप खाते वापरुन ब्लॉक केले जाऊ शकते. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जीबी व्हाट्सएप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. ते अधिकृत वेबसाइटवरून किंवा ऑनलाइन पोर्टलवरून एपीके फाइलद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते. अशात जीबी व्हॉट्सअ‍ॅप न वापरणेच हा एक चांगला पर्याय ठरेल. असे करता येईल डाउनलोड
  • सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनवर GB WhatsApp डाऊनलोड करा.
  • यानंतर, आपल्याला मोअर पर्यायावर क्लिक करावे लागेल, जे तीन डॉट्ससह येईल.
  • मग Foud Modes चा पर्याय निवडावा लागेल.
  • यानंतर, Update टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला चेक Update पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • मग Web Downloads पर्याय निवडावा.
  • यानंतर जीबी व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड होईल.
वाचा : वाचा: वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h56lJ6

Comments

clue frame