BSNL यूजर्संसाठी गुड न्यूज, Free मिळत आहे BSNL चे 4G SIM,पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड () ने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना फ्री मध्ये 4G सिम कार्ड (free sim card) देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. यासोबतच ही ऑफर त्या युजर्संना दिली जात आहे जे नवीन ग्राहक आहेत किंवा मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीचे युजर्स आहेत. या ऑफरला आणण्यामागे ग्राहकांना आकर्षित करणे हा कंपनीचा उद्देश आहे. वाचाः BSNL चे फ्री 4G SIM घेण्यासाठी करावे लागणार हे काम बीएसएनल ४ जी सिमकार्डसाठी साधारणपणे २० रुपये चार्ज आकारते. परंतु, या ऑफर अंतर्गत BSNLच्या सर्व 2G-3G ग्राहकांना फ्रीमध्ये ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ४ जी सिम कार्ड देत आहे. या 4G सिमला युज करण्यासाठी नवीन आणि MNP ग्राहकांना कमीत कमी १०० रुपयांचा पहिला रिचार्ज (FRC) करावे लागणार आहे. वाचाः BSNL ने आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये म्हटले की, युजर बेस मिळवणे, आपले रिवेन्यू वाढवणे आणि मंथली सिम सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी १ जुलै २०२१ पासून नवीन कनेक्शन आणि MNP ग्राहकांना ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत ४जी सिम देणार आहे. वाचाः असे मिळणार BSNL चे 4G SIM बीएसएनलचे फ्री सिम घेण्यासाठी ग्राहकांना पीओआय (ओळखपत्र) आणि पीओए (पत्ता असलेले ओळखपत्र) आपल्या जवळच्या बीएसएनएल रिटेलर शॉप मध्ये जमा करावे लागणार आहे. ही ऑफर केवळ सध्या केरळ टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AdxTUm

Comments

clue frame