टॉप-५ : ४जी स्मार्टफोन खरेदी करायचा आहे ? ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ‘हे’ आहेत सर्वोत्तम पर्याय
नवी दिल्ली : स्मार्टफोन कंपन्या कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे अनेक हँडसेट लाँच करत आहे. प्रत्येक कंपनी जबरदस्त फीचर्सचा फोन लाँच करण्याचा दावा करत आहे. तुम्ही देखील कमी किंमतीत जबरद्सत फीचर्ससह येणारा स्मार्टफोन शोधत असाल, काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच उत्तम ४जी स्मार्टफोन्सबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचाः Coolpad Mega 5M: हा ड्यूल सिम स्मार्टफोन अँड्राइड ८.० वर चालतो व यात क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ५ इंच एचडी स्क्रीन, १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच ५ मेगापिक्सल रियर आणि फ्रंटला २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात २००० एमएएचची बॅटरी मिळेल. फोनची किंमत ४,२९९ रुपये आहे. KARBONN X21: या फोनची किंमत ४,९९० रुपये असून, हा ड्यूल सिम स्लॉटसह येतो. फोनमध्ये ५.४५ इंचाची HD+ स्क्रीन देण्यात आली असून, यात २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये रियरला ८ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ३००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचाः Redmi Go: या फोनची किंमत ४,९९९ रुपये असून, ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड ८.१ वर काम करतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर मिळेल. यात ५ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. फोनच्या रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. Itel A23 Pro: ड्यूल सिम स्मार्टफोन अँड्राइड १० गो वर चालतो. यात ५ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज मिळते. सोबतच २ मेगापिक्सलचा रियर आणि ०.३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये क्वाड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पॉवरसाठी यात २४०० एमएएचची बॅटरी मिळते. फोनची किंमत ४,९९९ रुपये आहे. Panasonic Eluga I6: ड्यूल सिम सपोर्टसह येणाऱ्या या फोनमध्ये अँड्राइड ९ आणि क्वाड-कोर प्रोसेसर सपोर्ट मिळेल. यात ५.४५ इंच आयपीएस स्क्रीन, २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेज मिळते. सोबतच ८ मेगापिक्सल रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ३००० एमएएचची बॅटरी मिळेल. याची किंमत ५,००० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UM1ggk
Comments
Post a Comment