ओप्पोचा आणखी एक स्मार्टफोन येतोय, लाँचआधीच फीचर्स लीक

नवी दिल्ली. हँडसेट निर्माता कंपनी ओप्पोच्या आगामी स्मार्टफोन Oppo Reno 6Z संबंधित माहिती पुन्हा एकदा लीक झाली आहे. अलीकडेच,एका टिपस्टरने फोनची वैशिष्ट्ये लीक केली आहेत. लीक झालेले स्पेसिफिकेशन्स लक्षात घेता, Oppo Reno 6Zची वैशिष्ट्ये ओप्पो रेनो 6 सारखीच आहे असे म्हणता येईल. या मालिकेत Oppo Reno 6, Pro और Oppo Reno 6 Pro+ यापूर्वीच लॉन्च करण्यात आले आहेत. वाचा : Oppo Reno 6Z वैशिष्ट्ये : टिपस्टर अभिषेक यादव यांनी ट्वीटरद्वारे Oppo Reno 6Z च्या स्पेसिफिकेशन विषयी माहिती शेयर केली आहे. संरक्षणासाठी फोनमध्ये ६.४३-इंचचा AMOLED डिस्प्ले फुल-एचडी + रेझोल्यूशन, ६० हर्ट्ज रीफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास ५ वापरला जाऊ शकतो. याशिवाय, फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. फोनला अधिक पावरफुल बनविण्यासाठी ४३१० एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते आणि ही बॅटरी ३० W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते. कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचे तर Oppo Reno 6Z च्या मागील पॅनेलमध्ये वनप्लस ६ सारखा कॅमेरा सेटअप असू शकतो. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा फोनच्या मागील पॅनेलवर दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी Oppo Reno 6Z च्या समोर ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये दोन रंगांचे व्हेरिएंट्स अपेक्षित आहेत. काही काळापूर्वी समोर आलेल्या लीक्सवरून असे माहित झाले होते की, ओप्पो रेनो ६ झेडमध्ये गती आणि मल्टीटास्किंगसाठी मीडियाटेक डायमेंसिटी ८०० यू एसओसीचा वापर केला जाऊ शकतो. वाचा : वाचा : वाचा :


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jpTYcz

Comments

clue frame