‘या’ कंपनीने लाँच केला दमदार फीचर्ससह येणारा वॅक्यूम क्लिनर, मिळेल ६ हजारांची सूट

नवी दिल्ली : डायसन कंपनीने भारतात वॅक्यूम क्लिन कॅटेगरीचा विस्तार करत डायसन ओमनी-ग्लाइडला लाँच केले आहे. हे डिव्हाइस दररोजच्या सफाईसाठी चांगले असून, कॉम्पॅक्ट कॉर्ड फ्री डिझाइनसोबत येते. या डिव्हाइसमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. याविषयी जाणून घेऊया. वाचाः Omni-glide चे फीचर्स
  • हे कंपनीचे पहिले आहे. हे वॅक्यूम क्लिनर हाय, लो आणि मध्यम अशा तीन प्रकारच्या सफाईसाठी येते. या टूलमध्ये एक मिनी मोटराइज्ड टूलचा देखील समावेश आहे.
  • डायसनचा दावा आहे की, यात एक ओमनीडायरेक्शनल फ्लफी क्लीनर हेड आहे, जे कोणत्याही दिशेला मागे-पुढे आणि बाजुला सरकरण्यास सक्षम आहे. फ्लकी क्लिनर हेड ३६० डिग्री स्टेबलाइजिंग कॅस्टरवर तरंगते. कंपनीनुसार, अडथळे येऊ नये यासाठी कॅस्टरची उंची आणि स्थान निश्चित करण्यात आले आहे.
  • यात एक रिअरेंज्ड इन-लाइन फॉर्मेट देखील आहे, जे मशीनला अडचणीच्या ठिकाणी साफ करू शकते. कंपनीचा दावा आहे की, याच्या सेपरेशन सिस्टम, मोटर, फिल्टर आणि हँडलला एकासोबत ठेवण्यात आले आहे, जेणेकरून मशीन जमिनीवर सपाट होईल आणि सोफा अथवा फर्नीचरच्या खाली सहज सफाई करता येईल.
  • डायसनच्या अन्य उत्पादनांप्रमाणेच ओमनी-ग्लाइडमध्ये डायसन हायपरडिमियम मोटर देण्यात आली आहे. मशीन १०५,००० rpm पर्यंत स्पीन करते.
  • हे प्रोडक्ट कंपनीच्या ५-स्टेड फिल्टरेशन तंत्रज्ञानासोबत येते. जे ०.३ मायक्रोन एवढ्या छोट्या ९९.९९ टक्के कणांना पकडणे आणि स्वच्छ हवेच्या बाहेर काढण्यास सक्षम आहे.
  • या डिव्हासमध्ये रोटरी कॅचसोबत एक सरळ इजेक्शन मॅकेनिझ्म देण्यात आले आहे. यात धूळ बाहेर काढण्यासाठी मेश श्राउडच्या खाली सिलिकॉन कॉलर वाइप्स देखील आहे.
वाचाः Dyson Omni-glide ची किंमत आणि उपलब्धता या प्रोडक्टची किंमत ४०,९०० रुपये आहे. मात्र सध्या स्पेशल इंट्रोडकटरी किंमत ३४,९०० रुपये आहे. या वॅक्यूम क्लिनरला Dyson.in सोबतच, दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमध्ये ८ डायसन डेमो स्पेसमधून खरेदी करता येईल. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ठराविक क्रोम पार्टनर देखील या प्रोडक्टची विक्री करत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3joLYsf

Comments

clue frame