नवी दिल्ली. Honor स्मार्टफोन कंपनीने आज यासंदर्भात घोषणा केली आणि जाहीर केले की, विक्रीचे सर्व रेकॉर्डस् तोडत नवीन पहिल्याच विक्रीत ५०० दशलक्ष युआन किंमतीचे फोन विकले. नव्याने लॉन्च केलेल्या स्मार्टफोनबद्दल सांगायचे तर, याच्या बेस व्हेरिएंटमध्ये ६.५७ इंचचा ओईएलईडी वक्र स्क्रीन असून रीफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि सॅम्पलिंग रेट ३०० हर्ट्ज टच आहे. डिस्प्लेमध्ये सिंगल पंच होल डिझाइन आहे .जे, स्क्रीनच्या मध्यभागी आहे. तसेच, प्रो व्हेरियंटमध्ये ६.७२ इंचचा डिस्प्ले आहे. ड्युअल पंच होल डिझाइन स्क्रीनच्या डाव्या कोपर्यात देण्यात आला आहे . वाचा : दोन्ही हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८ जी मोबाइल प्लॅटफॉर्म आहे जो ६ एनएम प्रक्रिया तंत्रज्ञानावर आधारित आहे. अॅड्रेनो ६४२ एल जीपीयू ग्राफिक्ससाठी ५ जी क्षमतेसह प्रोसेसरमध्ये समाकलित आहे. प्रो व्हेरियंटमध्ये ४००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी १०० डब्ल्यू वायर्ड फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. Honor 50 मध्ये ४३०० एमएएच बॅटरी आहे जी ६६ डब्ल्यू वायर्ड वेगवान चार्जिंगसह येते. दोन्ही मॉडेल्स Android 11 आधारित मॅजिक UI ४.२ सह येतात आणि एनएफसी वैशिष्ट्यास समर्थन देतात. किंमतीबद्दल सांगायचे तर, Honor 50 च्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,६९९ युआन (सुमारे ३१,००० रुपये), ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,९९९ युआन (सुमारे ३५,००० रुपये) आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,३९९ युआन (सुमारे ३९,००० रुपये) आहे. तर, दुसरीकडे, च्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,६९९ युआन (सुमारे ४२,५०० रुपये) आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,९९९ युआन (सुमारे ४६,००० रुपये) आहे. वाचा : वाचा : वाचा :
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2UtjrqQ
Comments
Post a Comment