‘जिओ’ अन् ‘ गुगल’ आणणार स्मार्टफोन; गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दाखल होणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली रिलायन्स इंडस्ट्रीजची ‘जिओ’ ही टेलिकॉम कंपनी आणि ‘गुगल’ संयुक्तरीत्या ‘जिओफोन नेक्स्ट’ या नव्या स्मार्टफोनची निर्मिती करणार असून, हा फोन जगातील सर्वांत स्वस्त फोर-जी स्मार्ट फोन असेल, असा दावा मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केला. जिओफोन नेक्स्ट भारतीय बाजारपेठेत गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर, १० सप्टेंबरपासून दाखल होणार आहे. वाचाः देशात अजूनही सुमारे ३० कोटी नागरिक टू-जी नेटवर्कचा वापर करतात. त्यामुळे देशाला टू-जी मुक्त करण्यासाठी हा फोन आणत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यावेळी या फोनची किंमत अंबानी यांनी सांगितली नाही. या फोनच्या निर्मितीसंदर्भात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. सर्वसामान्यांना परवडणारा स्मार्टफोन तयार करण्यासाठी गुगलने सोबत येण्याची तयारी दर्शवली आहे. वाचाः ‘गुगल’चे म्हणणे काय? सुंदर पिचाई यांनी सांगितले की, या स्मार्टफोनमध्ये अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीम असेल. भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन वापरू देणे हे गुगलचे लक्ष्य आहे. यासाठी या फोनमध्ये रीड अलाउड आणि ट्रान्सलेट नाउ ही दोन नवी फीचर फोनमध्ये असणार आहेत. वाचाः एअरटेलकडून स्वागत रिलायन्स जिओच्या या नव्या नियोजत स्मार्टफोनचे जिओचा प्रतिस्पर्धी असलेल्या भारती एअरटेलने स्वागत केले आहे. ई-मेलवरून एअरटेलने सांगितले आहे की, अशा प्रकारच्या स्वस्त स्मार्टफोनचे स्वागत आहे. या फोनचा ग्राहक एअरटेललाच प्राधान्य देईल, असा विश्वासही एअरटेलने व्यक्त केला आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jd0Fi2

Comments

clue frame